नवीन लेखन...

देवा जोतिबा चांगभलं

१९८४ सालातील गोष्ट आहे. अजय सरपोतदार या माझ्या काॅलेजमधील मित्रामुळे त्याच्या वडिलांशी, बाळासाहेब सरपोतदाराशी माझा संपर्क आला. त्यांनी ‘कुलस्वामिनी अंबाबाई’ या चित्रपटाची निर्मिती करुन तो ‘प्रभात’ टाॅकीजला प्रदर्शित केला. या चित्रपटाच्या पेपरमधील जाहिराती व प्रिमियर शो चे निमंत्रण कार्ड आम्ही केलेले होते. […]

काळा फळा…

खेड्यातील शाळांमध्ये स्वातंत्र्यानंतर भिंतीलाच आयताकृती काळा रंग देऊन फळा केला जात असे. काही ठिकाणी तिकाटण्यावर काळा फळा ठेवून गुरूजी शिकवत असत. शहरातील शाळेमध्ये भिंतीवर लाकडी चौकट असलेले फळे असत. पहिली ते चौथीपर्यंत मी फळ्याच्या जवळ जाऊ शकलो नव्हतो. लांबूनच फळा निरखत होतो. […]

दख्खनची राणी म्हणजेच डेक्कनक्वीनचा वाढदिवस

दख्खनच्या राणीच्या प्रवाशांना सुद्धा तिचे फार कौतुक असते आणि दरवर्षी हे प्रवासी हिचा वाढदिवस साजरा करतात. दख्खनच्या राणी ही भारतातली अशी एकमेव जुनी गाडी आहे की, जिला कधीही कोळशाचे इंजिन लावले गेलेले नाही. ती शक्यतो विजेवरच धावते, पण कधी अडचण आलीच तर तिला डिझेल इंजिन जोडले गेलेले आहे. […]

ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे

रंगनाथ पठारे हे कथा आणि कादंबरी या दोन्ही साहित्यप्रकारांत ते लेखन करतात. वैचारिक, समीक्षा आणि अनुवाद असे प्रकारही त्यांनी हाताळले. मात्र, ते रमले कथा-कादंबरीत. […]

सुप्रसिद्ध लेखक, नाटककार, अभिनेते गिरीश कर्नाड

गिरीश कर्नाड यांनी भारतामधील ज्या अनिष्ट राजकीय घटना झाल्या त्यांचा सतत विरोधच केला आहे. गिरीश कर्नाड हे १९७४-१९७५ मध्ये फिल्म्स अँड टेलिव्हिजन इन्स्टिटयूटचे डायरेक्टर म्हणून होते. त्याचप्रमाणे ते संगीत नाटक अकादमीचे १९८८ ते १९९३ पर्यंत चेअरमन होते तर कर्नाटक अकादमीचे अध्यक्षही होते. […]

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा अर्थात एस टीचा वाढदिवस

आज राज्यातील खेड्या पाड्यांतून, गावांगावांतून लिलया विहार करणारी आपल्या सर्वांची लाडकी लालपरी आता ७३ वर्षांची झाली आहे. लाल डबा म्हणून आजही ओळखली जाणारी बस सेवा म्हणजे ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ’ अर्थात एस.टी बसची स्थापना होऊन आज ७३ वर्षं पूर्ण झाली. […]

प्रभात फिल्म कंपनीचा ९२ वा वर्धापनदिन

प्रभात’ची स्थापना १ जून १९२९ रोजी कोल्हापुरातील मंगळवार पेठेत झाली. आज ‘प्रभात’च्या स्थापनेस ९१ वर्ष होत आहेत. प्रभातचा महिमा आणि जादू इतकी जबरदस्त होती की, देशभरात गावोगावी ‘प्रभात’ नावाची अनेक सिनेमा थिएटर्स अस्तित्वात आली. आजही प्रत्येक मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची सुरुवात ‘प्रभात’ मधील ‘लख लख चंदेरी’ गाण्याने होते’. […]

जगणे अमुचे नका विचारू, आम्ही पाखरे भटकी !

असा डंका आम्ही फार पूर्वी मिरवलाय. हे भटकेपण स्वीकारलेलं असो की लादलेलं ! तेथे एकाकीपण आलंच. जगणं जगायसाठी बाहेर पडावं लागतंच. पण “तो प्रवास सुंदर होता ” अशी ग्वाही देता येतेच असं नाही. […]

सांग मना काय राहिले

वेदना विपन्नावस्थेची सारी भोगूनी झाली.. तरीही प्रारब्धयोगे सारे सुखऐश्वर्य लाभले.. तरीही जीव हा मोहपाशात कां ? गुंतलेला.. वाटते जीवा ! बरेच काही अजूनही राहिले..।।..१ सांग मना , आज तुज जवळ काय नाही.. तुज श्रेष्ठ विवेकी जन्म लाभला मानवाचा.. वात्सल्यप्रीतीच्या सरोवरी तुडुंब रे डुंबला.. अनंत जन्मांचे हे भाग्य अलौकिक आगळे..।।..२ आज जीवात्म्यावर मंडरते रे सांज केशरी.. आत्माही […]

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ७ )

कै. आनंद यादव सरांना मी ओळखत होतो पण त्यांची प्रत्यक्षात कॉलेज संपल्यावर कधी भेट झाली नव्हती. पुण्यात मराठी साहित्य परिषदेत एका कार्यक्रमात मी मुद्दाम कै. प्रा.आनंद यादव सरांची आवर्जून भेट घेतली. सातारच्या जुन्या आठवणींची उजळणी झाली. […]

1 233 234 235 236 237 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..