वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू डेरेक मरे
जवळ जवळ १७ वर्षे तो वेस्ट इंडिंजसाठी क्रिकेट खेळत होता आणि एक यष्टीरक्षक म्हणून हा कालखंड निश्चित मोठा आहे . डेरेक मरे याने ६२ कसोटी सामन्यामध्ये १९९३ धावा केल्या त्यामध्ये त्याची ११ अर्धशतके होती आणि त्याची सर्वोच्च धावसंख्या होती ९१ धावा . त्याने यष्टिरक्षण करताना १८१ झेल घेतले आणि ८ जणांना स्टंपिंग करून बाद केले म्हणजे १८९ जणांना बाद केले. […]