२३ मे – जागतिक कासव दिन
कासवांच्या सातही प्रमुख प्रजाती सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणूनच त्या प्राणिसंवर्धन आणि संरक्षण कायद्याच्या परिघात येतात. समुद्री कासवांना पकडणे बेकायदेशीर आहे. […]
कासवांच्या सातही प्रमुख प्रजाती सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणूनच त्या प्राणिसंवर्धन आणि संरक्षण कायद्याच्या परिघात येतात. समुद्री कासवांना पकडणे बेकायदेशीर आहे. […]
केशवराव भोळे यांनी इ.स.१९३३ साली ’नाट्यमन्वंतर’ नावाची नाट्यसंस्था काढली. त्या संस्थेने रंगमंचावर आणलेल्या ’आंधळ्यांची शाळा’या नाटकाचे त्या काळी शंभराहून अधिक प्रयोग झाले होते. पहिला प्रयोग मुंबईच्या रिपन थिएटरात १जुलै १९३३ रोजी झाला. […]
संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा सर्वप्रथम ठराव करण्यात आला तो 1946 च्या बेळगावात झालेल्या साहित्य संमेलनात! पुढे संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. समितीच्या आंदोलनातून महाराष्ट्राची निर्मिती झाली, परंतु ती संयुक्त महाराष्ट्राची नव्हती, तर अपूर्ण महाराष्ट्राची! […]
१९५५/५६ सालची गोष्ट. उन्हाळ्याचे दिवस. . तो शेतीच्या कामासाठी मुंबईहून दिवड्यासाठी निघाला.. दिवडा…. साठगांवच्या पुढचं त्याचं गाव. साठगांवहून बसने चार तास लागत. सकाळची एस्टी न मिळाल्याने त्याला रात्र साठगावात काढणं भाग होतं. ते फार मोठं गाव नव्हतं. प्रथमच संध्याकाळच्या एसटीने तो उतरला होता . रात्रीचे दहा वाजत होते. आता हॉटेल मध्ये राहणं भाग होतं. […]
जिथे वेचला प्राजक्त तिथे गोवऱ्या नशिबी आल्या कोमल निशिगंधाच्या पाकळया नजरेसमोर चोरीला गेल्या कुठे मागावी दाद फिर्याद सुगंधच फितूर झाला बघता बघता चोराच्या श्वासात तो सामावला शुन्य नजर,मती गुंग, बधिर मी स्वतः ला हरवून बसलो स्वतः च पेटवलेल्या चितेत धुमसत जळु लागलो © अरविंद टोळ्ये ९८२२०४७०८०
नातं जिवा-भावाचं सढळ…..अढळ ! नातं प्रिती-प्रेमाचं रसाळ …..मधाळ ! नातं राग-लोभाचं खट्याळ…..स्नेहाळ ! नातं दुःख – हर्षाचं उदास …..उधाण ! नातं विरहात एकटे व्याकुळ ! नातं मनांत सूर गात्रात ! नात्याची गुंफण रेशमी….रेशमी ! बंध रेशमाचे अखंड….अतूट ! कस नात्याचा झळाळे सुवर्ण ! पाईक नात्याचा पवित्र ….पावन ! बाज नात्याचा मस्त उनाड ! साज नात्याचा प्रेम […]
आयताकृती फडके वाडा … आयताच्या एका बाजूला झाकलेली विहीर , पंप रूम आणि चाफ्याचं मोठं झाड .. उरलेल्या तीनही बाजूंना एक मजली चाळीसदृश घरं … अगदी बाजूबाजूला लागून … दोन्ही कोपऱ्यात लाकडी जीना …. मध्यभागी सगळं अंगण … अंगणात काही उगाच वाढलेली तर काही मुद्दाम लावलेली झाडं …. […]
तिला मी पहिल्यांदा माझ्या घरातूनच म्हणजे गॅलरीतून पहिले, चार चौघीसारखी ती , कुठे काम करते , काय करते त्यावेळी माहित नव्हते. आमच्या घरच्यांना माहीत होते. […]
माझा मित्र म्हणाला होता- ” अरे, एकच प्याला जुनं झालं पण कोणी दारू पिणं सोडलं का?” सगळंच मेक बिलिव्ह ! […]
‘आवाज कि दुनिया के दोस्तो’…हा आवाज आमच्या पिढीने रेडिओ सिलोन वर अनेक वेळा ऐकला आहे तो आवाज. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions