प्रथम तिज पहाता अग्नी मनी चेतला , झालो बेधुंद मी अंतरी वणवा पेटला ! आर्त नजर तिची मन घायाळ करून गेली एकमेकात गुंतलो आम्ही …. मनोदेवता सांगून गेली ! खट्याळ चमक तिच्या नेत्री स्वर्ग सुख पाझरले गात्री त्या क्षणी गेलो हरवून ती माझी,मी तिचा बनून ! होऊनी एकाकी जेंव्हा .. मोजतो अंधारी तारे , अलगद चाहुलीने तिच्या फुटती नवे धुमारे ! जेंव्हा दुखी बुडे आकंठ उरे जीवनी नुसती खंत पुरे तिची चाहूल आगळी जीवनी येई नवी झळाळी ! क्षणो क्षणी वाटत राही तिच्यात मी सहचरी पाही झाले दूर सगळे अज्ञान जुळता, तिचे मन माझे मन ! © अरविंद टोळ्ये ९८२२०४७०८० आपल्या अभिप्रायाचे स्वागत. आवडली असेल तर नावासह जरूर शेअर करा.