नवीन लेखन...

चष्मा (गूढकथा)

पंतांना नुकतीच गाढ झोप लागली होती. वयोमान प्रमाणे, त्यांची झोप कमीच झाली होती, साडेबारा एक तर निद्रादेवीच्या आगमनाची, नेहमीचीच वेळ! अचानक त्यांना जाग आली. कोणी तरी हलवून जागे केल्या सारखी! काही क्षण ते अंथरुणावर तसेच पडून राहिले. आपण कोठे आहोत? हि कोणती जागा आहे? कोकणातली कारली तर नाही?  […]

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार सर यदुनाथ सरकार

भारतातील प्रसिद्ध बंगाली इतिहासकार व संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार सर यदुनाथ सरकार यांचा इंग्रजी वाङ्मय व इतिहासविषयक ग्रंथ यांचा व्यासंग होता आणि त्यांचा ग्रंथसंग्रहही मोठा होता. […]

आत्मज्ञान !

इतरेजन जेव्हा योजना आखण्यात आणि स्वप्न पाहण्यात व्यस्त असतात, तेव्हा आपण आपल्या छोट्याशा प्रवासाचा आनंद घ्यावा. माझ्याभोवती खूप वैभव आहे, माझ्या क्षमता, दृष्टी आणि आकांक्षा यापेक्षा हे अधिक महत्त्वाचे आहे, मी सतत काहीतरी  ‘करण्यापासून’ आता फक्त ‘असण्यात’ मग्न आहे, अस्तित्वात असलेल्या सगळ्या लहानथोर गोष्टींनी ,बदलत्या संक्रमित निसर्गाने मी चकित होत असतो, असं वाटणं स्वाभाविक असतं. […]

मंदीतील सुवर्णसंधी

सरकारची धोरणे,वाढते प्रदूषण कमी करण्याचे आव्हान आणि हळूहळू होणारी जनजागृती या मुळे ग्राहक इलेक्टिक वाहनाकडे वळायला नुकतीच सुरवात झाली आहे. हजारो कोटींची गुंतवणूक विद्युतवाहना मध्ये होत आहे. कोव्हिडं चा हा काळ आणि वाहनवर्गाचे संक्रमण लवकरच संपेल आणि पेट्रोल/डिझेल व विद्युत वाहनांना लवकरच चांगले दिवस येतील. ज्या उद्योजकांना वाहन क्षेत्रात व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी, विशेषतः ज्यांना ऑटो डीलर बनायचे आहे त्यांच्यासाठी येते एक वर्ष खूप महत्वाचे आहे. तुम्ही या वर्षात विद्युत दुचाकी वाहनांची डीलरशिप खूप कमी गुंतवणूकीत घेऊ शकता आणि 2025 नंतर येऊ घातलेल्या विद्युत वाहन क्रांतीचा घटक बनून, प्रचंड नफा व स्थैर्य मिळवू शकता. […]

सुप्रसिद्ध कवी, लेखक, समीक्षक प्रा. रमेश तेंडुलकर

प्रा. रमेश तेंडुलकर हे माणूस म्ह्णून खूप साधे आणि मनाने खूप मोठे होते. अत्यंत साधी रहाणी आणि आपल्या घरी येणारा माणूस कितीही साधा असला तरी त्याचे त्यांच्या घरी अगत्याने स्वागत होत असे. त्याचे चिरंजीव नितीन तेंडुलकर उत्तम कवी, लेखक आहेत. त्याचप्रमाणे त्याचा मुलगा सचिन तेंडुलकर हा भारताचा गाजलेला क्रिकेटपटू आहे. तर त्यांचे दुसरे चिरंजिव नितीन तेंडुलकर हे देखील वडिलांप्रमाणे लेखन करतात, कविता करतात. […]

चूक कळून आली ..

शाळेच्या व मित्रांबदद्लच्या आठवणी किती म्हणून सांगाव्या ..?अजूनही मागे शिल्लक राहतात.सारं आपलं बालपण हे शाळेभोवती गुंफलेलं असतं…शाळेत भेटलेले मित्र,त्यांच्याशी केलेली मैत्री सारं आठवतं…त्यामुळे आपल्यात आलेलं धाडस ,आल्या प्रसंगाला तोंड देणं यातून खूप काही शिकायला मिळतं.आपल्या चुकांमधून हळूहळू शिकत असतो आपण. […]

अशक्य ते शक्य केलं कोरोनाबाबांनी

कोरोना जगभर फिरुन भारतात आला.त्यानी जनजीवन विस्कळीत केलं.आपण घरी बसून कंटाळलो. कधी एकदा लोकांमधे मिसळतो, असं म्हणता म्हणता बुडाला मोड फुटले. आपल्या देशात कधीही बंद नपडणारी मुंबईची लाईफलाईन पूर्ण बंद झाली. कार्यालये ओस पडली, मग ती सरकारी असोत की खाजगी. […]

अन्नपूर्णा

जेंव्हा जेंव्हा  प्रवासाने आम्ही दोघे दमलेलो असतो …….. थकून, कंटाळून घरी येतो, झोमॅटो तिला नको असतं, म्हणून पिठलं भाताचा साधा बेत ठरवते ! माझी आवड सांभाळून ती सांडगे पापड़ हि तळते ….. त्यासोबत  न विसरता लोणच्याची फोड वाढते कारण आम्ही दोघे दमलेले असतो तेंव्हा खरंच पिठलं भात असा साधाच बेत असतो ! कैरी लिम्बाचे लोणचे …. […]

स्वप्नविक्या- ‘थोडासा रुमानी हो जाय !’

हा चित्रपट चालला नाही, याचं फारसं आश्चर्य वाटलं नाही. नाना, विक्रम – मला वाटतं हे दोघं त्यानंतर ” नटसम्राट” चित्रपटात एकत्र आलेत. – मीही तो आजवर चित्रपटगृहात पाहिलेला नाही. खूप वर्षांपूर्वी अचानक एका रात्री डी डी चॅनेल वर लागला असताना माझ्या नशिबी चांगला योग आला. अर्थात त्याची निर्मिती दूरदर्शनची आहे आणि बहुधा सरकारी अनास्थेने त्याचे मार्केटिंग चांगल्या प्रकारे न झाल्याने तो वाटेतच संपला आणि प्रेक्षक एका अप्रतिम चित्रानुभवाला मुकले. […]

नामांकित संगीतकार व गायक अच्युत ठाकूर

अच्युत ठाकूर हे गेल्या ४० हून अधिक वर्षांपासून संगीत क्षेत्रात कार्यरत होते. १९८३ साली ‘श्री रामायण’हा मराठी चित्रपट त्यांनी संगीतबद्ध केलेला पहिला चित्रपट होता. त्यातली गाणी त्या वेळी गाजली होती. […]

1 243 244 245 246 247 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..