विठू ‘माउली’ च्या अंगणातील दोन अश्वत्थ – दांडेकर आणि देगलूरकर !
विठ्ठलाला आणि “माउलीं “ना अभिप्रेत असलेला वारकरी जीवनप्रवाह साक्षात जगणारे दोन कैवल्यधर्मी म्हणजे वै. मामासाहेब दांडेकर आणि वै. धुंडामहाराज देगलूरकर ! त्यांच्या उल्लेखाविना ही “वारी” कायमच अपुरी राहील. दोघेही आयुष्यभर “ज्ञानेश्वरी” जगत राहिले.एक ज्ञानमार्गाचे बोट धरून विज्ञाननिष्ठा आणि बुद्धिप्रामाण्यवाद सिद्ध करीत राहिला तर दुसऱ्याने भक्तिमार्ग चोखाळला. गंतव्य एकच होते आणि अंतिमतः ज्ञानेश्वरीने ते गाठायला मदत केली. […]