‘चकीत’ करणारी नाती !
“रामप्रसाद की तेरहवीं” पाहिला. काही दिवस आधी अशा कथेवर आलेला समांतर ” पग्लाईट (PAGGLAIT) पाहिला होता. एक मृत्यू आणि त्याभोवती तेरा दिवस मनाविरुद्ध फिरणारे कुटुंबीय, नातेवाईक ! त्यांच्यातील दऱ्या, वरवरची मलमपट्टी, अंतर्गत धुसफूस आणि अशा कर्मकांडात रस नसलेली (पण जबरदस्तीने ओढून आणलेली) नवी पिढी. मग ते तेरा दिवस जुनेपुराणे हिशेब चुकते करण्याकडे कल. भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला “तेच तेच ” सांगणे, तोंडाला पदर धरून. […]