शाळा हेच आमचे समाज माध्यम..
तेंव्हा शिक्षकाजवळ छडी असायचीच आज जसं मोबाईल असतो तशी.. त्या छडीमुळेच तर व्हायरल व्हायचे आमचे पराक्रम.. त्या छडीचीच फ्रेन्ड रिक्वेस्ट यायची आमच्या पाठीवर.. मग काय.. त्यात वेगवेगळे राग, आलाप, ताना घेऊन सुरु व्हायचे संगीत.. थोडी धूसफूस.. हे आमचं फेसबुक.. बुकात फेस लपवून फुंदत-फुंदत रहायचं कितीतरी वेळ.. थोड्या वेळात सारं विसरलं जायचं… आजही हे आठवलं की हसू आवरता येत नाही. सगळं आमच्या सोशल मिडिया मध्ये लोकप्रिय होतं.. कारण शाळा हेच आमचं समाज माध्यम होतं.. प्रभावी !!! […]