नवीन लेखन...

‘शुक्र तारा’ जो संगीतातला

३० एप्रिल…..  ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे उर्फ खळे काका यांचा जन्मदिवस ! “सर्व सर्व विसरू दे गुंतवू नको पुन्हा” हे गाणं म्हणता म्हणताच ज्यांच्या संगीतात , लयीत आणि तालात आपण गुंतत जातो ते खळेकाका ! ” गोरी गोरी पान” ते “लळा जिव्हाळा शब्दच खोटे”, “या चिमण्यांनो परत फिरा रे” ते “ऊन असो वा असो सावली”, “चुकचुकली […]

इथेच मारू बोंबा आणिक इथेच बांधू बांबू

( ही कविता प्राणवायुला समर्पित !) इथेच मारू बोंबा आणिक इथेच बांधू बांबू । जरा उसासून थांबू ,शोधू कलेवरांचे तंबू ।। लाडेकोडे वाढवलेली इथेच तोडू झाडे । प्राणवायुचे नरडे दाबून इथेच घालू राडे ।। इथे ओरपू पाणी आणिक तिथेच टाकू विष्ठा । जगण्यासाठी हवी कशाला विकून टाकू निष्ठा ।। एक विषाणू श्वास संपवी मनीमानसी कैक । […]

तो….

जातो छापील अभ्यासक्रमाच्या बाहेर काळजी घेतो ” मानसिक ” आरोग्याची हळुवार शब्दांनी फुलवतो मने विकासाच्या फुलांना गंध देतो त्याला आयुधं लागत नाही – वन्ही पेटवायला ! तो अनादी आहे- अनंत आहे त्याच्यावाचून जग शक्य नाही तो कधी सांदीपनी होतो , कधी चाणक्य तर कधी अब्दुल कलाम आई तर तो कायम असतोच पण वडिलपणही अबोलपणे निभावतो ” […]

फुजिझुका (प्रति-फुजी)

जपानचा पवित्र पर्वत कोणता ? असं विचारलं तर पटकन कोणीही (ह्या देशाबद्दल थोडीफार माहिती असणारे) फारसा विचार न करता अंदाजाने सुद्धा सांगू शकतील माउंट फुजी! गिर्यारोहकांचे, ट्रेकर्सचे जपान मधले एव्हरेस्ट! फुजीसान वरती चढण्याचा आनंद आणि पुण्य प्रत्येकाला लाभावं म्हणून तोक्यो व इतरही काही ठिकाणी फुजिझुका म्हणजे प्रति-फुजीसान बांधलेले आहेत. ह्या फुजिझुका म्हणजे प्रति-फुजी  वरती चढणे हे खरोखरच्या फुजी वरती जाऊन आल्याचे पुण्य पदरी घालते असे येथील लोक मानतात. […]

मजेमजेचे खेळ

आज हे खेळ राहिले नाहीत. . . कुठेच. मुलांच्या बालपणातही दडपणाने शिरकाव केलेला आहे. टिव्ही, मोबाईल, गेम याकडे आकर्षित झाली आहेत मुले. खूप हुशार असलेली ही पिढी मात्र प्रचंड तणावाखाली दिसत आहे. यांना भरकटत जाण्या अगोदर त्यांच्यातल्या सर्जनशीलतेला समृद्ध करण्यासाठी जाणीव पूर्वक भयमुक्त वातावरण निर्मितीची आवश्यकता आहे. . . […]

जखमांचे वण

किती खाल्ला मार, किती खाल्या शिव्या याची गणतीच नव्हती. एकच गोष्ट सतत कानी पडत होती. उनाड आहे, बावळट आहे, धडपड्या आहे, तडफड्या आहे, मूर्ख कुठचा. भडीमार होत होता आईकडून शब्दांचा.. आम्ही होतो बालपणीच गांधीवादी. एका गालांत कुणी मारली तर दुसरा गाल पुढे करणारे. मुकाट्यानें मान वर न करता सारे शब्द पचविणारे. खेळणें, कुदणें, उड्या मारणें, त्यातच […]

तेरे मेरे बीचमे कैसा हैं ये बंधन !

” एक दूजें के लिये ” ने १९८१ साली धुमाकूळ घातला होता. चित्रपटाच्या प्रत्येक आघाडीवर ( अभिनय, गीत, संगीत, पार्श्वगायन, गोव्याची नयनरम्य पार्श्वभूमी ) हा चित्रपट देखणेबल होता. “बॉबी” नंतर ची ही तुफान गाजलेली प्रेमकथा (शेवट सुखांत नसला तरीही). कमल आणि रती ही नवोदित फ्रेश जोडी देणारा हा चित्रपट कितीही वेळा पाहिला तरी मन तृप्त होत नाही. […]

मोराचा पिसारा..

सरस्वतीचं वाहन मोर. सरस्वतीच्या सानिध्यात असलेल्या मोराचं कोणतंही पिस पहा.. ती सर्व एकसारखीच छान दिसतात. त्यांच्यात हे चांगलं, ते बरं.. अशी तुलना करता येत नाही… अगदी तसंच जगदीश खेबुडकर यांच्या प्रत्येक चित्रपट गीतांबद्दल आपण म्हणू शकतो. या अलौकिक सरस्वतीच्या पुजाऱ्यानं मराठी चित्रपटांसाठी जेवढी गीतं लिहिली, ती एकाहून एक सरस आहेत… […]

1 250 251 252 253 254 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..