नवीन लेखन...

देवाचिया दारीं

देवाचिया दारीं, मनाचा मुजरा, झुकवूनिया मान, हासे तो चेहरा ।। धृ ।। जाई जेव्हां मंदिरी, घेतां प्रभू दर्शन, आनंदानें नाचते, हर्षित चंचल मन, नयन साठविती, त्या मंगल ईश्वरा, देवाचिया दारी मनाचा मुजरा  ।।१।। नदीनाले धबधबा, उंच उंच वृक्ष वेली, कोकीळ गाती, मोर नाचे, इंद्रधनुष्याच्या खाली, रोम रोमातूनी शिरे, निसर्गाचा फवारा, देवाचिया दारी मनाचा मुजरा  ।।२।। दु:खी […]

भारतात रंगीत दूरचित्रवाणी प्रक्षेपणाची सुरुवात

२५ एप्रिल १९८२ रोजी भारतात रंगीत दूरचित्रवाणी प्रक्षेपणाची सुरुवात झाली. १९८२ मध्ये भारतात झालेल्या ‘एशियाड’ या आशियायी क्रीडा स्पर्धेमुळे भारतातले क्रीडाप्रेम किती वाढीला लागलं हे माहीत नाही; मात्र त्यानिमित्तानं रंगीत झालेल्या टीव्हीचं प्रेम मात्र झपाट्यानं वाढत गेलं हे नक्की ! […]

ज्येष्ठ साहित्यिक व झुलवाकार उत्तम बंडू तुपे

तब्बल १६ कादंबऱ्यांसह अनेक लघुकथांना शब्दरूप देणाऱ्या उत्तम बंडू तुपे यांची ‘झुलवा’ ही कादंबरी प्रचंड गाजली. तेव्हापासून ते ‘झुलवा’कार म्हणूनच ओळखले जाऊ लागले. खुळी, कळा, कळाशी, नाक्षारी, भस्म, चिपाड, इंजाळ, झावळ या त्यांच्या कादंबऱ्याही गाजल्या. अनेक कादंबऱ्यांना पुरस्कार मिळाले. […]

‘अस्तु’ – उत्तरायणाचे लामणदिवे !

काही चित्रपट बघितल्याशिवाय मरायचं नसतं म्हणे ! “अस्तु ” त्यातील एक आहे. एकदा बघितला की संवेदनांची समृद्धी वाढते. वारंवार बघितला की जगण्याचे पापुद्रे अलगद सुटत जातात आणि मोकळं व्हायला होतं. […]

आठवावे मृत्यूसी

निसर्गाची रचना, जन्म मृत्यृची योजना, गती देई जीवन चक्रांना,  ईश्वरी शक्ती  १ उत्पत्ती लय स्थिती, या त्रिगुणात्मिक शक्ती याच तत्वे निसर्ग चालती,  अविरत   २ ईश्वरी योजना महान, खेळ जीवनाचा चालवून घडवी शक्तीचे दर्शन, निसर्ग रूपाने   ३ वस्तूचे निरनिराळे आकार,  चेतना देवूनी करी साकार यास जीवन संबोधणार,  आपण सारे   ४ मातीची भांडी असती, विभिन्न रूपे मिळती वापरून […]

बरसात चित्रपटाची ७२ वर्षे

राजकपूर यांनी बरसात या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत धमाल उडवली होती. चित्रपट सर्वच दृष्टीने गाजला. राजकपूर यांचा बरसात चित्रपट म्हणजे ही जणू एक भावस्पर्शी कविताच होती. या चित्रपटामुळे राजकपूर यांच्या बहुढंगी व्यक्तिमत्वाचे दर्शन झाले. २१ एप्रिल १९४९ रोजी बरसात चित्रपट प्रदर्शित झाला होता. राजकपूरचे गुरू केदार शर्मा यांच्या मते ‘बरसात’ राजकपूरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट होता. एक भावमधुर निसर्गरम्य आणि संगीतमय चित्रपट म्हणून बरसातचा उल्लेख करावा लागेल. […]

बिनतारी यंत्रणेचा शोधक गुग्लिएल्मो मार्कोनी

गुग्लिएल्मो मार्कोनीच्या रुपाने असा माणूस पृथ्वीवर अवतरलाच. बिनतारी संदेशवहनाच्या बाबतीत कसलीही पार्श्वभूमी नसताना मार्कोनीने या तंत्रज्ञानाला सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात नेऊन ठेवले आणि अतिशय लोकप्रिय बनवले. […]

सनी देओलचा ‘मोहल्ला अस्सी’

कल्याणी ताई आमच्या एका व्याख्यानात म्हणाल्या होत्या- ” देव आपली परीक्षा पाहात असतो. ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत तो मदतीला येत नाही, पण (भक्तांचे) १२ ही वाजू देत नाही.” अस्सी घाटावर शांतपणे दिवे सोडणाऱ्या सनी – साक्षी बरोबर आम्हां पती-पत्नीलाही त्यावेळी कल्याणी ताईंच्या वाक्यामागे साक्षात काशी विश्वेश्वर उभा असलेला जाणवला. […]

क्रिकेटपटू सिडने बार्न्स

सिडने बार्न्स वयाच्या 21 व्या वर्षी 1894 मध्ये जलद गोलंदाज म्हणून नावारूपास येत होते तेव्हा ते स्टॅफोर्डशायर काउंटी क्रिकेट क्लबमध्ये ग्राउंड स्टाफ म्हणून काम करू लागले. सिडने बार्न्स यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना खेळला तो 13 डिसेंबर 1901 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी नाबाद 26 धावा केल्या आणि 65 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या […]

आंतरराष्ट्रीय भाषातज्ज्ञ प्रा. अशोक केळकर

व्याकरणाची आवड आणि भाषिक प्रश्नांबद्दलच्या कुतूहलामुळे ते भाषाविज्ञानाच्या अभ्यासाकडे वळले. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून अशोक केळकरांनी लिंग्विस्टिक्स विथ अॅन्थ्रॉपॉलॉजी या विषयात पीएच.डी.केली. […]

1 253 254 255 256 257 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..