नवीन लेखन...

अभिनेत्री शांता हुबलीकर

भालजी पेंढारकर या ख्यातनाम दिग्दर्शकांच्या हाताखाली त्यांना अभिनयाचे धडे मिळाले. भालजींच्या साध्या राहणीचा आणि वक्तशीरपणाचा त्यांच्यावर प्रभाव पडला. कान्होपात्रा या चित्रपटात त्यांनी कान्होपात्रेच्या आईची भूमिका केली. इथे दिनकर कामण्णा, चिंतामणराव कोल्हटकर आदींकडून त्यांना अनेक गोष्टी शिकावयास मिळाल्या. […]

८ वी ड – भाग ८

८ वी ड ही प्रवृत्ती आहे का? स्थिती आहे का? किंवा अवस्था आहे? असे अनेक विचार मनात येतात आणि हे फक्त लहान मुलांमध्येच दिसतात तर याला उत्तर नाही असेच द्यावे लागेल. […]

श्री कृष्ण जन्मी सेवेसाठी स्पर्धा

चालली स्पर्धा साऱ्यांची,  प्रभूची सेवा करण्याची….।।धृ।।   निशाराणी संचारी निद्रीत जाई पहारेकरी खट्याळ वारे धावूनी दारे दिली उघडूनी विज चमकूनी आकाशी   मदत होई वसुदेवाची….१ चालली स्पर्धा साऱ्यांची प्रभूची सेवा करण्याची   पावसाच्या पडती सरी पक्षी नाचती तालावरी कोकीळेचे सुरेल गान आनंदाने वातावरण नागराजा फना काढूनी   काळजी घेई नव बाळाची….२ चालली स्पर्धा साऱ्यांची प्रभूची सेवा करण्याची   […]

श्रीरामभुजंगस्तोत्र – मराठी अर्थासह

श्रीरामभुजंगस्तोत्र हे श्रीरामाचे आदि शंकराचार्यांनी रचलेले स्तोत्र समजण्यास खूप सोपे व त्यामुळे भाविकांच्या मनाला भिडणारे आहे. समर्थ रामदासांच्या वाङ्मयामुळे व रामदासी संप्रदायामुळे महाराष्ट्रात रामभक्तांचे प्रमाण मोठे आहे. त्यांना हे स्तोत्राचे मराठी रूपांतर आवडेल अशी खात्री आहे. या स्तोत्राची रचना ‘ भुजंगप्रयात ’ (यमाचा यमाचा यमाचा यमाचा) या वृत्तात केली असल्याने त्याला    ‘ रामभुजंगम् ’ असे नाव दिले आहे. अपवाद श्लोक २२ चा. तो रथोद्धता वृत्तात (राधिका नमन राधिका लगा) आहे.   […]

८ वी ड – भाग ७ – कार्ट आणि मुलगा

संघर्ष! कुणाला चुकला आहे मुंगी पासून माणसापर्यंत सर्वांना आहे. अगदी लहान शाळकरी मुलांना देखील करावा लागतो. याचा अंदाज शिक्षकांना, पालकांना खरोखर आहे का? […]

काव्य कलश

ही दया कुणाची झाली, सापडे शब्दांचा झरा, उपसतो जरी सतत,  होत नसे निचरा….१, गोड पाणी शब्दांचे,  ओठी अमृत वाटे, पेला भरता काठोकाठ,  काव्य हृदयी उमटे….२, पेला पेला जमवूनी,  कलश भरून आला, नाहून जाता त्यात,  देह भान विसरला….३, सांडता पाणी वाहे,  पसरते चोहीकडे, आस्वाद घेई जो जो, विसर जगाचा पडे….४   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

क्रिकेटपटू विनू मंकड

प्रत्येक खेळाडूची अशी इच्छा असते की त्यावेळी विस्डेन ( WISDEN ) च्या पहिल्या पाच खेळाडू मध्ये यावे. विनूभाई यांचे नाव १९४७ साली त्यामध्ये आले. त्यांनी फलंदाजी आणि गोलंदाजीमधील दुहेरी कामगिरी करून विक्रम त्यावेळी कसोटी सामन्यांमध्ये रचला तो म्हणजे १००० ध्वनीचा आणि १०० विकेट्सचा. याला इंग्लिशमध्ये ‘ डबल ‘ म्हणतात. त्यांनतर हा विक्रम इयान बोथट ने मोडला. ही दुहेरी कामगिरी त्यांनी २३ कसोटी सामन्यांमध्ये पुरी केली तर एम. ए . नोबल या खेळाडूला २७ कसोटी सामने लागले तर कीथ मिलरला ३३ कसोटी सामने लागले. […]

लेखक पु. भा. भावे

मराठी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. भा. भावे. त्यांच्या नावावर सतरा कथासंग्रह आहेत. त्यातील सतरावे वर्ष, पहिले पाप, संस्कार, सुगंध, प्रतारणा, मोहं, फुलवा, नौका, प्रायश्चित्त अशा अनेक कथा आजही आठवतात. . जिथे जिथे दंभ, ढोंग, खोटेपणा आहे तिथे तिथे भाव्यांची लेखणी वज्रप्रहार करते. भाव्यांच्या काही कथांवर चित्रपटही तयार झालेले आहेत. […]

करण चाफेकर

आज भारतात इतक्या वर्षांनंतरही ३ डी प्रिंटर ही संकल्पना रुजू शकत नाही जी प्रदेशात अनेक वर्षे आधी रुजली आहे . याचे एकमेव कारण म्हणजे आपले पुस्तकी ज्ञान. बटन दाबले की यंत्र चालू झाले पाहिजे ही भावना अगदी खोलवर रुजली आहे ती नष्ट झाली पाहिजे यासाठी प्रॅक्टिकल ज्ञान असणे आवश्यक असते. ३ D प्रिंटर झाल्यानंतर करण राजभवनाला ए . पी . जे . अब्दुल कलाम यांची भेटला होता. […]

मुंगी

मग्न राही सतत   आपल्याच कामीं अन्नासाठी तूं    फिरे दाही दिशानी  १ जमवितेस कणकण    एकत्र करुनी दूर द्दष्टीचा स्वभाव    दिला तुज कुणी  २ सुंदर तुझी वास्तूकला   वारुळ केले छान सहस्त्रांच्या संखे     राहतेस आनंदानं  ३ कष्ट करण्याचा गुण    दाखवी साऱ्याना कष्टाला पर्याय      नसे ह्या जीवना  ४   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

1 262 263 264 265 266 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..