नवीन लेखन...

दिग्दर्शक, अभिनेते गजानन जागीरदार

त्यांचा ‘ छोटा जवान ‘ हा चित्रपट खूप गाजला, त्यावेळी तो चित्रपटगृहात दाखवला गेलाच परंतु शाळाशाळांतून दाखवला जात असे. त्या चित्रपटासाठी त्यांना ‘मी विशेष अभिनेता ‘ म्ह्णून त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या ‘ दोन्ही घरचा पाहुणा ‘ या चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचा बहुमान मिळाला. […]

सुप्रसिद्ध गायक गजानन वाटवे

गजानन वाटवे यांनी अनेक नामवंत कवीच्या कविता घेऊन त्या कविता लोकांपर्यंत पोहोचवल्या . त्यांची रानात सांग कानांत , आपुले नाते मी भल्या पहाटे येते , दोन ध्रुवावर दोघे आपण , यमुना काठी ताजमहाल , आभाळीचा चांद माझा , चंद्रावरती दोन गुलाब , ती पहा बापूजींची प्राणज्योती , मी निरंजनातील वात , गाऊ त्यांना आरती , तू असतीस तर झाले असते उन्हाचे गोड चांदणे , मोहुनीया तुजसंगे नयन खेळले जुगार.. अशी त्यांची असंख्य गाणी त्यावेळी रसिकांना तोंडपाठ होती. […]

‘शेवटच्या रंगा’चे प्राणवायू !

प्रसंगी हा चित्रपट लाऊड, अंगावर येणारा वाटतो खरा, पण आयुष्यही त्यातील पात्रांच्या अंगावर पदोपदी असेच धावून येत असते आणि त्यांचे चिमुकले भावविश्व चिरडून टाकायचा प्रयत्न करीत असते. […]

गतकाळ विसर

विसरून जा भूतकाळ तो, नजर ठेवूनी भविष्यावरी, वर्तमानी राहून प्रवाही, जीवन सारे यशस्वी करी ।।१।।   व्यर्थ होतील प्रयत्न तुझे, उगाळता गत आठवणी, खीळ पडेल उत्साहाते, अपयश आले हे जाणूनी ।।२।।   ज्ञान जगाचे मिळूनी तुला, जन्म जहाला आजच खरा, अनुभवी नव बालक तूं, वाहून नेई जीवन धुरा ।।३।।   — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

क्रिकेटपटू अजित वाडेकर

अजित लक्ष्मण वाडेकर यांचा जन्म १ एप्रिल १९४१ रोजी मुबंईत झाला. मध्यमवर्गीय कुटूंबात असते तसे वातावरण त्यांच्या घरचे वातावरण होते. दादरला शिवाजी पार्कजवळ ते रहात असत. अजित वाडेकर यांचा स्वभाव लहानपणी थोडा अबोल आणि गंभीर होता. ते सदोदित वाचनात गर्क असायचे . जेम्स हॅडली चेस त्यांचा आवडता लेखक होता . त्यांना क्रिकेटमध्ये फारशी गोडी नव्हती . […]

गोष्ट सांगा आणि गणित शिकवा – ३

गणिताचा प्रश्न पाहिल्यावर थिजल्यासारखे होते. काय करू काही सुचतच नाही!!! हा माझाच नव्हे,अनेकांचा अनुभव आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना सुरू कुठे करावं हा प्रश्न असतो, तर तितक्याच विद्यार्थ्यांना समीकरण मांडणे अवघड जाते. म्हणून स्ट्रेटजी उपयोगी ठरते. त्यावरचा उपाय – ‘स्ट्रॅटजि’ – ‘रणनीती’. पहिले काय करावं हे सुचावं लागत नाही, माहित असते आणि ते केले के कोंडी फुटते … पुढची वाट दिसू लागते … […]

निसर्गाची ध्यान प्रक्रिया

ऋषी, संत महात्मे, थोर व्यक्ती, ध्यान धारणा, समाधीयोग यांची महती अनुभवाने गातात. जागृत राहून याचा आनंद घ्या म्हणतात. सत्य आहे. परंतु सामान्यांसाठी कठीण. निसर्गानेच कदाचित् सर्व जिवीत प्राण्यासाठीं गाढ निद्रेच्या मार्गातून, अवस्थेतून धान परिणाम साध्य करण्याचे योजीले नसेल कां ? […]

बॉलिवूडचा विनोदी अभिनेता जगदीप

जगदीप यांना भेटलो तेव्हा आम्ही तिघे होतो , त्यांच्याबरोबर जावेद जाफरी होता , स्वाक्षरी घेतल्यावर आमचा फोटो जावेद जाफरी ने काढला. परंतु जावेदच्या स्वाक्षरी घेतली नाही कारण , जगदीप समोर असताना माझ्या डोळ्यासमोर ‘ सुरमा भोपाली ‘ होता. […]

पुष्पा, आय ‘लव्ह’ टिअर्स !

आतून पोखरलेला पण बाह्यतः कणखर खन्ना वेळोवेळी पुष्पाला मात्र आय “हेट” टिअर्स म्हणत सावरत असतो. देखण्या, तरुण नंदूला त्याच्या बालपणीच्या आठवणीतल्या झाडापाशी खन्ना आणून सोडतो आणि माय -लेकरांना भेटवतो. आता त्याला कळतं – अश्रू कायम खारट नसतात. एका भेटीच्या कुशीत दुसरा निरोप दडलेला असतो. आणि निरोप म्हटलं की अश्रू मस्ट ! […]

1 267 268 269 270 271 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..