संगीतरत्न प्रसाद सावकार
प्रसाद सावकार यांचा जन्म १४ डिसेंबर १९२८ बडोदे येथे झाला. प्रसाद सावकार यांचे पूर्ण नाव सांबप्रसाद रघुवीर सावकार. गोमंतकीय संगीत रंगभूमीवरील नामवंत सावकार घराण्यात त्यांचे वडील रघुवीर सावकार हे स्त्रीभूमिकांसाठी प्रसिद्घ असलेले गायक-नट होते व ते ‘रंगदेवता’ या पदवीने ओळखले जात. वडिलांच्या ‘रंगबोधेच्छु नाट्यसमाज’ या नाट्यसंस्थेत प्रसाद सावकारांचा बालपणापासूनच वावर असल्याने त्यांच्यावर लहानवयातच नाटक प्रसाद सावकार […]