नवीन लेखन...

धक्का (कथा)

बसमधून प्रवास करताना प्रतिभाला एका तरूणाने धक्का मारला. कदाचित तो चुकुनही लागला असेल पण प्रतिभाला तेव्हा तसं वाटलं नाही म्हणून ती त्याला म्हणाली,” काय रे ! आंधळा आहेस काय? की मुलगी पाहून जाणुनबुजुन धक्का मारतोस ? प्रतीभाची ही वाक्ये त्याने ऐकली नसतील हे तर शक्यचं नव्हतं. पण तरीही ऐकून न ऐकल्यासारखं करत तो पुढे निघुन गेला. […]

जागतिक संगीतोपचार दिन – २६ मार्च

जगभरात २६ मार्च हा दिवस जागतिक संगीतोपचार दिन म्हणून साजरा केला जातो. संगीतोपचार हा एक स्वास्थ्यवर्धक उपाय आहे. आजार, व्याधी शरीराला विळखा घालत आहेत, त्यावर बर्याचदा औषधांच्या मात्राही काम करीत नाहीत. संगीतात असणार्‍या अनोख्या संमोहन शक्तीमुळे सध्या रोगांवर पूरक उपचार म्हणून संगीतोपचार लोकप्रिय होत आहे. […]

‘देवबाभळी’- व्यक्त /अव्यक्ताचा झगडा !

फक्त दोन (दृश्य स्वरूपातील ) स्त्री – पात्रांनी सशक्तपणे पेललेलं, अलीकडच्या काळातील संगीत नाटक म्हणजे – देवबाभळी ! त्या दोघींचे “अहो “होतेच पार्श्वभूमीला, पण दिसत नव्हते. एकतर ऐकूही येत नव्हता. पण त्या दोघांचेही अस्तित्व नाटकाला पुरुन उरले होते. […]

बीज – वृक्षाचे चक्र कुणाचे ?

सुक्ष्म बिजाचे रोपण करतां, वृक्ष होई साकार कोण देई हा आकार ?  १ तूं तर दिसत नाही कुणाला,  घडते मग  कसे ? कोण हे घडवित असे ?  २ प्रचंड शक्ती देऊनी बीजाते, प्रचंड करितो वृक्ष कोण देई ह्यांत लक्ष ?  ३ त्याच वृक्ष जातीचे गुणही येती, रुजलेल्या त्या बीजांत ही किमया असे कुणांत ?  ४ तोच […]

सहल !

उन्हाळा संपता, संपता आभाळात ढगांची उपस्थिती जाणवू लागली कि, आमच्या वश्याचे मन बेचैन व्हायला सुरु होत. त्यानं पावसाची एखादी सर येऊन गेली तर, विचारायलाच नको! हा महिना, महिना मुडक्याच्या टपरीकडे न फिरकणार, दिवसातून तीन, तीन चकरा मारतो. ‘अल्ते कारे ते दोघे?’, म्हणजे मी अन शाम्या, म्हणून मुडक्याला भंडावून सोडतो. तर या वश्याचे आणि पावसाळ्याचे काही तरी कनेक्शन आहे? पण नेमकं काय? तेच तर आज तुम्हाला सांगणार आहे! […]

‘मंदारमाला’ नाटकाचा पहिला प्रयोग – २६ मार्च १९६३

२६ मार्च १९६३ या दिवशी मंदारमाला नाटकाचा पहिला प्रयोग झाला. जय शंकरा गंगाधरा, जयोस्तुते उषा देवते… हरी मेरो जीवन प्राण आधार… अशा “मंदारमाला‘ या नाटकातील गाण्यांनी मराठी रसिकांच्या मनाला भुरळ घातली होती. त्या काळी मंदारमाला हे नाटक तुफान गाजले होते. संगीतभूषण रामभाऊ मराठे, प्रसाद रावकर, ज्योत्स्ना मोहिले, विनोदमूर्ती शंकर घाणेकर, पंढरीनाथ बेर्डे अशा दिग्गजांच्या गायन व अभिनयाने हे नाटक गाजले; त्याचे शेकडो प्रयोग झाले. त्या वेळी नाटकाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध अभिनेत्री सुधा करमरकर यांनी केले होते; तर संगीत दिग्दर्शन रामभाऊ मराठे यांचे होते. […]

परब्रह्मप्रातःस्मरणस्तोत्रम् सार्थम् – मराठी अर्थासह

श्री आदिशंकराचार्यांनी रचलेल्या या स्तोत्रात केवळ तीनच श्लोक आहेत. पाठकाचे कायावाचामने अत्युच्च तत्त्वाचे चरणी समर्पण करण्याचा त्याचा उद्देश आहे. दिवसाच्या सुरुवातीलाच आपल्या मनात येणा-या विचारांचा आपल्या दैनंदिन व्यवहारांवर मोठा परिणाम होत असतो. जर आपण ते विचार पवित्र व स्वर्गीय करू शकलो तर आध्यात्मिक प्रगतीच्या दिशेने आपली नक्कीच वाटचाल होईल. या दृष्टीने ही पहाटेस करावयाची प्रार्थना निश्चितच महत्त्वाची आहे. […]

मिठापरी जीवन

खारेपणा हा अंगी असतां, कोण खाईल केवळ मीठ, परि पदार्थाला चव येई, मिसळत असता तेच नीट ।।१।।   जीवन सारे खडतर ते, भासते मिठासम मजला, केवळ जीवन बघता तुम्हीं, पेलणें अवघड सर्वाला ।।२।।   तेच जीवन सुसह्य होई, ‘आनंदात’ जेंव्हां मिसळते, हर घडीच्या प्रसंगामध्ये, समाधानाचे अंकूर फुटते ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

जगणें अटळ असतां

वाट कुणाची बघतो आम्हीं,   ठावूक असते ते सर्वांना मृत्यू हा तर अटळ असूनी,  केव्हांही येई अवचित क्षणा….१,   आगमनाचा काळ तयाचा,   कल्पनेनें ठरविला जातो अचूक जरी ते शक्य नसले,   विचार त्यावरी करिता येतो…२,   जीवन म्हणती त्या काळाला,   जगणे आले मृत्यू येई तो जगण्यापुढे पर्याय नसतां,   सुसह्य करण्या प्रयत्न होतो…३,   तन मनाला सुख देवूनी,   जीवन […]

गोष्ट सांगा आणि गणित शिकवा – २

गणितावर आधारित शैक्षणिक-ललित साहित्य फार कमी बघायला मिळते. अशा साहित्यात आधुनिक संकल्पना आल्या तर बरे होईल असं वाटते. मुलांना आकर्षित करता येईल, हे अवघड नाही – इंट्रेस्टिंग आहे, उपयोगी आहे असे सांगता येईल. एक मार्ग दिसला तो मांडून पाहतो आहे. आपला प्रतिसाद प्रार्थनीय. […]

1 269 270 271 272 273 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..