नवीन लेखन...

काळपुरुष

शहापूर जिल्हा ठाणे. शासकिय ग्रामीण रुग्णातयांत वैद्यकीय अधिकारी असतानाचा प्रसंग. शवविच्छेदनासाठी एका पन्नाशीतील व्यक्तीचा मृतदेह आणला होता. पोलीस पंचनामा रिपोर्ट वाचला. त्या प्रमाणे घटनेचा तपशील अंतर्मुख करायला लावणारा खचितच असा होता. […]

जयराम हर्डीकर

…… पण जयरामचा अकाली मृत्यू त्यालाही भिजवून गेला होता. त्याच्या अश्रूंच्या थेंबातून जयराम मला खिजवत होता. ही हार कोणाची? […]

व्यक्तिमत्त्व विकास तज्ज्ञ वंदन नगरकर

प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व विकास तज्ज्ञ वंदन नगरकर हे कॉर्पोरेट ट्रेनर असून ते गेली अनेक वर्ष याच क्षेत्रात पूर्णवेळ कार्यरत आहेत. ते विनोदी अभिनेते, नाटककार, लेखक राम नगरकर यांचे चिरंजीव आहेत. भाषणाचे प्रभावी तंत्र, भरारी यशाची, टर्निग पॉईट, पालकांचे चुकते कुठे? प्रभावी इंटर टेक्निक्स व स्पिक विव कॉन्फिडक्स (इंग्रजी) अशा सहा पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. अनेक प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर लेख प्रसिद्ध झाले आहेत. […]

कुटुंब !

भव्य मंडप उभारण्यात आला होता. मुख्य प्रवेशद्वारावर कानापर्यंत थोबाड फाकवलेल्या, उर्मटचेहऱ्याच्या माणसाचा हात जोडलेला, पांढऱ्याशुभ्र कपड्यातला, बाराफुटी कट आऊट बोर्ड, स्वागताला उभा केला होता. डीजेच्या भिंती, आणि बाकी — वेगळं काहीच नव्हतं. नेहमीची लगीन घाई, माणसांची वर्दळ, तेच ते. […]

दैव भोग !

‘दैव देतं अन कर्म नेतं’ ही म्हण शेतकऱ्यांच्या बाबतीती नेमकी उलटी लागू होते. काळ्या आईला घामाचा अभिषेक करून शेतकरी आपल्या कर्माने हिरवेगार रान फुलवतो. मात्र, त्याचं दैव त्याला साथ देत नाही. कधी अवकाळी पाऊस, गारपीट कधी अवर्षण तर कधी रोगांचा प्रादुर्भाव एकपाठोपाठ एक संकटे त्याच्या मागे लागलेली असतात. काय करावं शेतकऱ्याने? […]

पिल्लू

लोंबकळलेल्या खाली शेपट्या, पिल्लू मौज करे कशी,—? शोधक बुद्धी, चौकस नजर, अफलातून फळते अशी,–!! युक्ती,शक्ती, बुद्धी, जिवाला आहे देणगी, सदुपयोगाने करा किमया, मौजेने जगा,ही वानगी,—!! दिसे पिल्लू छोटेसे, तरी मस्त आहे कल्पनाशक्ती, आरामात कसे झोके घेई, दुनियाच भासे त्यास छोटी,—!! डोळे मिचकावत, पिल्लू बघते आजूबाजूच्या साऱ्या सृष्टीकडे, भरभरून लुटेन आनंद मी, सोडवेन निसर्गाचे अनवट कोडे,! ©️ […]

मैं ना भुलुंगा…

१९७५ साल ! जूनी ११ वीची परीक्षा संपली होती. त्या सुमारास आमच्या घरी सुभाषकाका आले होते. परीक्षा संपल्याच्या आनंदात ते मला आणि माझ्या भावाला उमा टॉकीज मध्ये नुकताच लागलेला “रोटी कपडा और मकान ” चा ९.३० चा शो बघायला घेऊन गेले. तेव्हापासून लता-मुकेशच्या “मैं ना भुलुंगा ” चे गारुड अजूनही अबाधित आहे. […]

दया प्रेम भाव

दया प्रेम हे भाव मनी,  जागृत कर तू भगवंता । तुला जाणण्या कामी येईल,  हृदयामधली आद्रता ।। १ शुश्क मन हे कुणा न जाणे,  धगधगणारे राही सदा । शोधत असता ओलावा हा, निराश होई अनेकदा ।। २ पाझर फुटण्या प्रेमाचा ,  भाव लागती एक वटूनी । उचंबळणारे ह्रदय तेथे,   चटकन येईल मग दाटूनी ।। ३ दया […]

न जाणलेले भगतसिंह….

२३ मार्च १९३१ हा शहीद दिवस म्हणून ओळखला जातो.. ज्या ऐतिहासिक दिवशी भगत सिंह ,सुखदेव आणि राजगुरु हे तिघे वीर पुरुष हसत हसत, भारतासाठी फासावर चढून शहीद झाले. त्या काळी कितीतरी जवान वीरांनी क्रांतिकारी होण्याचा निर्णय घेऊन कायमचा घराला राम राम केला असणार आणि त्याची दखलही आपल्या इतिहासाने घेतली नसेल. […]

येतात तुझे आठव

येतात तुझे आठव, डोळ्यांत काळे ढग, उरांत फक्त पाझर, शिवाय नुसते रौरव ,–!!! येतात तुझे आठव , होते सरींची बरसात, चित्तात उठे तूफान”, मनात चालते तांडव,–!!! येतात तुझे आठव, प्रीतीचे हे संजीवन , स्मृतींचे मोठे आवर्तन, त्यांचे लागती न थांग,—!!! येतात तुझे आठव, सरींची त्या उधळण, शब्दांचे पोकळ वाद, कल्पनांचे नुसतेच डाव,–!!! येतात तुझे आठव, अश्रू […]

1 270 271 272 273 274 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..