नवीन लेखन...

भटकलेले शिल्पकार

॥आम्ही भारताचे शिल्पकार॥ आम्हीच घडवतो भविष्य आम्हीच घडवतो वर्तमान नव्या भारताच शिल्पकार आम्ही नव्या भारताचे शिल्पकार राजनेत्यांचे गुलाम आम्ही पत्रकारांचे भक्त साकार देशाचे ना आम्हाला काही ना स्वप्नांना आकार नव्या भारताचे शिल्पकार…. दंगे घडवु नेत्यांपायी फोडु दुसरर्‍यांचे घरदार सामान्यांचे आवाज दाबु ना करु त्यांना सहकार नव्या भारताचे शिल्पकारंं…… असुरक्षित भारत लक्ष आमुचे अयोग्य मतदान भविष्यात आमच्या […]

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज विचारावे कोणी मला आणि मी सांगावे माझा आदर्श कोण ? छत्रपती शिवाजी महाराज आणखी कोण ? इतिहासातील आवडती तुझी थोर व्यक्ती कोण ? देवतुल्य शिवराय आणखी कोण ? इतिहास भिनलाय माझ्या नसानसात मराठ्यांच्या शौर्याचा त्यांच्या चातुर्याचा आणि धर्मावरील प्रेमाचा… शिवराय नसते तर ? मी ही नसतो नाही ? हा प्रश्न नाही तर एक […]

नियतीची चाकोरी

अथांग सारे विश्व हे, असंख्य त्याचे व्यवहार  । कसे चालते अविरत, कुणा न कधी कळणार  ।। खंड न पडता केव्हाही, सूर्य-चंद्र येई आकाशी  । वादळ वारा ऋतू बदले,  चूक न होई त्यांत जराशी  ।। घटना घडे पुन्हा पुन्हा, आकार रूपे बदलत  । हर घटनेचे वलय, फिरे एकची चाकोरीत  ।। प्रत्येक कालक्रमणाच्या आखून,  दिल्या मर्यादा  । ठेवी […]

ससा

प्रातिभा आाणि विजयचा नुकताच  विवाह झाला होता. विजयला विवाह करण्यात तसा फारसा रस नव्हता पण  घरच्यांच्या आग्रहाखातर  नाईलाजानं  त्याला तस करावं लागलं  होत. प्रातिभाचीही विवाहाबाबत फारशी काही स्वप्ने  बहुदा नसावित. […]

निरोप्या!

उंच्यापुऱ्या भारदस्त विष्णुपंतांनी शेजारच्या तांब्याच्या पेल्यातले पाणी, तोंड वर करून नरड्यात ओतले. पांढऱ्याशुभ्र धोतराच्या सोग्याने, ओल्या मिश्या साफ केल्या. गरमागरम चहा बशीत ओतून मन लावून पिला. चहा पिताना, अभिमानाने आपल्या वाडलोपार्जीत, भव्य दगडी तटबंदी असलेल्या वाड्यावरून समाधानाने नजर फिरावी. हत्तीवर अंबारीत बसून त्यांचे पूर्वज, या समोरच्या वीतभर रुंद भरीव लोखंडी दाराच्या कमानीतून येत असत! […]

अहं ब्रह्मास्मि

एके काळीं हवे होते, मजलाच   सारे कांहीं आज दुजाला मिळतां आनंद मनास होई   माझ्यातील   ‘मी ‘ पणानें विसरलो सारे जग तुझ्यामध्येंही ‘ मी ‘  आहे, जाण येई कशी मग   जेंव्हा उलगडा झाला साऱ्या मध्ये असतो ‘मी’ आदर वाटू लागला, जाणता  ‘अहं  ब्रह्मास्मि‘   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

लाईटबोर्ड उर्फ लर्निंग ग्लास

जेव्हा आपण मुलांकडून दिवसाचे चार तास ऑनलाईन लेक्चर्स अटेंड करायची अपेक्षा करतो तेव्हा विविध गोष्टींचा वापर करून आपली लेक्चर्स जास्तीत जास्त इंटरेस्टिंग कशी होतील याची जबाबदारी प्रत्येक लेक्चररची असते. गुगल मीट किंवा झूम वर घेतलेली त्याच त्याच प्रकारची लेक्चर्स कंटाळवाणी ठरू शकतात. […]

दृष्टांताची किमया

निराकार तो असूनी व्यापतो, सर्व विश्व मंडळ, सूक्ष्मपणातही दिसून येतो, करी जगाचा प्रतिपाळ ।।१।।   दर्शन देण्यास भक्त जणांना, धारण करितो रूप, तसाच दिसे नयनी तुमच्या, ध्यास लागता खूप ।।२।।   दृष्टांत होणे सत्य घटना ती, जीवनी तुमच्या घडे, वेड लागता प्रभू चरणाचे, सदैव स्वप्न पडे ।।३।।   कुणामध्येही अस्तित्व दाखवी, हीच त्याची किमया, परि टिपून […]

रोड टू संगम – ही पण बाजू !

साधारण हीच सकाळची वेळ ! ब्रेकफास्ट आटोपून दुसऱ्या चहाची वाट पाहात असताना सहज टीव्ही च्या रिमोटची खुंटी पिरगाळली. स्टार गोल्डवर ” रोड टू संगम ” पाटी दिसली. नांव न ऐकलेले पण ओम पुरी व परेश रावल (सोबतीला काही मराठी नांवे – राजन भिसे, स्वाती चिटणीस वगैरे) ! […]

भावनाशून्य माणूस

बसमधून प्रवास करताना रहदारीमुळे बस काही काळ रस्त्यावर थांबली असता मी सहज खिडकीतून बाहेर रस्त्याच्या कडेला पाहीलं तर एक दारू प्यायलेला बिगारी काम करणारा कामाठी आपल्या बायकोला बेदम मारहान करत होता. आणि ती निमुटपणे त्याचा प्रतिकार न करता त्याचा मार खात होती. […]

1 275 276 277 278 279 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..