नवीन लेखन...

शब्दाची ठिणगी

ठिणगी पडूनी पेटे ज्वाला,   आकाशाला जावूनी भिडती नष्ट करूनी डोंगर जंगल,    हा: हा: कार तो माजविती…१   शब्दांची ही ठिणगी अशीच,   क्रोधाचा तो वणवा पेटवी मर्मघाती तो शब्द पडतां,   अहंकार तो जागृत होई…२,   सूड वृत्तीचा जन्म होवूनी,    वातावरण ते दुषीत होते संघर्षाचा अग्नी पेटूनी ,   जीवन सारे उजाड करिते…३,   कारण जरी ते असे क्षुल्लक,   […]

भीतीपोटी कर्म करता

भीतीपोटी सारे करतां असेच वाटते….।।धृ।। विवेकानें विचार करा, तुम्हांस हे पटते   त्रिकाळ चाले पूजा अर्चा प्रभूविषयी होई चर्चा बालपणींच पडे संस्कार सारे देण्या समर्थ ईश्वर कृपे वाचूनी त्याच्या, तुम्हां सुख दुरावते….१ भीतीपोटी सारे करता, असेच वाटते,   चूक असे हे ठसें मनाचे कर्म ठरवीं तुम्हींच तुमचे सहभाग नसे यात प्रभूचा सारा खेळ असे तो मनाचा […]

कवीची श्रीमंती

खंत वाटली मनास    कळला नसे  व्यवहार  । शिकला  सवरला परि    न जाणला संसार  ।। पुढेच गेले सगे सोयरे   आणिक सारी मित्रमंडळी  । घरे बांघूनी धन कमविले   श्रीमंत झाली सगळी  ।। वेड्यापरी बसून कोपरी   रचित होता कविता  । कुटुंबीय म्हणती त्याला   कां फुका हा वेळ दवडीता  ।। सग्यांच्या उंच महाली   बैठक जमली सर्व जणांची  । श्रेष्ठ पदीचा […]

लेखणी (कथा)

आता तो मुलगा – अर्थात मी – विजय जाधव एक नवोदित लेखक म्हणून उदयाला आलोय. समाजात एक घमेंडी, अकडू, आणि पाषाण  हृदयी तरूण म्हणून वावरतोय. आज लोक माझ्याकडे काम घेऊन यायला धजावतात कारण ती करायला माझ्याकडे वेळ नाही आणि ती करणं माझ्या प्रतिष्ठेला  शोभतही नाही. […]

मृगजळ (कथा)

त्या दिवशी  प्रतिभाला एका तरूणाचा चुकून  धक्का लागला असता प्रतिभाला वाटलं त्या तरूणानं आपल्याला जाणुनबुजून धक्का दिला असावा म्हणून प्रतिभा रागावून त्याला म्हणाली, ‘काय रे ! आंधळा आहेस का ? दिसत नाही का ? की जाणुनबुजून धक्का मारतोस ?’ त्यावर तो तरूण रागावून म्हणाला, तू काय स्वतःला महाराणी समजतेस काय ? तसं असेल तर रिक्षाने किंवा टॅक्सीने जात जा ! […]

गुलजार – बात “एक” पश्मीने की !

हा मनुष्य कायम हातातून निसटतो. त्याचा स्पर्श जाणवतो, त्याचे शब्द भिडतात, त्याचे संवाद तीक्ष्णपणे काळजात घुसतात. त्याच्या धवल वस्त्रांवरचे फाळणीचे डाग पुसट होता होत नाही. त्याचे चित्रपट म्हणजे त्याच्या कविता ! भाषाप्रभुत्व शब्दातीत, आपल्याला जे बोलायचे असते, नेमकं तेच त्याच्या लेखणीतून / संवादातून / कथांमधून उमटतं. व्यक्तिगत सुखदुःखांवर तो वेगवेगळ्या माध्यमातून भाष्य करतो पण त्यातही हाती […]

आई (कथा)

वर्गात प्रतिभा अतिशय हुशार  असण्याबरोबरच वकृत्व आणि अभिनय याचीही तिला योग्य जाण होती. शाळेत होणाऱ्या वत्कृत्व  आणि नाटयस्पर्धेत ती नेहमीच भाग घेत असे त्यात तिला बक्षीसही मिळत असे आपल्या यशाचे श्रेय प्रतिभा नेहमीच आपल्या आईला देत असे . ते देताना  ती म्हणे ” माझ्या आईने मला नेहमीच मी मुलगी असूनही एखादया मुलाप्रमाणे स्वतंत्र दिलं ! […]

मुक्ताचे क्षितीज

‘ वाचू आनंदे ‘चा आगळा वेगळा कार्यक्रम. संपूर्ण सभागृह भरलेले. व्यासपीठावर माईक समोर ती उभी . नाव मुक्ता . इयत्ता चौथी. आवाज खणखणीत . उभं राहण्याची , प्रेक्षकांकडे पाहण्याची आणि त्यांची दाद मिळताच किंचित स्वाभाविक झुकून नम्रपणे दाद स्वीकारण्याची एक विलक्षण शैली. देहबोली आत्मविश्वासाने भरलेली. […]

माझे खाद्यप्रेम – २

साधारणपणे ज्या लोकांना चवीने वेगवेगळ्या गोष्टी खाण्याची सवय आहे त्यांना खाऊ घालण्याची सवय सुद्धा असते, किंबहुना ती असावी. वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालण्यात एक वेगळीच मजा आहे अर्थात ती स्वत: अनुभवावीच लागते, तिचा देखावा करून चालत नाही. तस पाहिलं तर आज जग खूप पुढे गेलय त्यामुळे आज अनेक जणांना जेवण करता आलच पाहिजे ही बाब पटेनाशी झाली आहे. स्वतःचा चहा देखील करता न येणारी आज समाजात अनेक माणसे आहेत. अर्थात त्यांना ह्या गोष्टीची लाज नव्हे तर भूषण वाटत. […]

‘सिमटी हुई ये घडियां’ – नात्यांचा लेखाजोखा !

सांगलीत वालचंदला असताना आम्ही “चम्बल की कसम ” नामक एक पडेल चित्रपट पाहिला तो खय्याम आणि साहिर या जोडगोळीच्या एका हळुवार प्रेमगीतासाठी ! अन्यथा राजकुमार, त्याला प्रतिकूल मौशुमी आणि होडीवाला ठोकळा शत्रुघ्न असलं कॉम्बिनेशन बघणं नजरेला फारसं आल्हाददायक नव्हतं. […]

1 277 278 279 280 281 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..