देशप्रेमाचा ज्वर
नवं वर्षाच्या प्रथम दिनी सहज लेखा -जोखा घेत होतो. फेब्रुवारी १०, २०२० ला थिएटर मध्ये जाऊन ” शिकारा ” हा चित्रपट पाहिलेला आणि दुसऱ्याच दिवशी त्यावर ” चेहेरा-पुस्तिकेवर ” लिहिलं होतं. त्यानंतर आजपर्यंत चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघितलेला नाही, पण २०२० साली चित्र /नाट्य विषयांवर तब्बल ३६ नोंदीवजा लेखन झालंय चेहेरा-पुस्तिकेवर ! कोरोना च्या कृपेने दूरदर्शन आणि लॅपटॉप च्या पडद्याला डोळे डकवून घेतल्याचा परिणाम. त्याबद्दल कोरोना चे “आभार” (?) […]