2021
‘थप्पड’ – शेवाळलेल्या नात्यांसाठी आवश्यक ‘तुरटी’ !
हा चित्रपट आला , चांगलं परीक्षण वाचलं आणि तो गेलासुद्धा ! नुकताच तो घरबसल्या बघायला मिळाला. लॉक डाउन बाबा की जय ! सगळीच नाती सुरुवातीला जुळताना /जुळविताना हवीहवीशी, नवलाईची असतात. कालांतराने अतिपरिचयात त्यांच्यावर शेवाळं साचतं. दोन्ही बाजू एकमेकांना गृहीत तरी धरायला लागतात किंवा ते टिकविण्याचा एकतर्फी प्रयत्न तरी पाहायला मिळतो. […]
तेज
किरणात चमक ती असूनी, तेजोमय भासे वस्तूंचे अंग, सूक्ष्म अवलोकन करीता, कळे तेज ते, वस्तूचाच भाग ।।१।। जसे तेज असे सूर्यामध्यें, पत्थरांतही तेज भासते दृष्टी मधले किरणे देखील, सर्व जनांना हेच सांगते ।।२।। तेजामुळेंच वस्तू दिसती, विना तेज ती राहील कशी, तेज रूप हे ईश्वरी असूनी, तेज चमकते वस्तू पाशी ।।३।। डॉ. भगवान […]
आभाळाएवढा !
त्यानं साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आणि तो एकदम मोठा होऊन गेला . मोठा म्हणजे अगदी खूपच मोठा . आभाळा एवढ्या उंचीचा आणि समुद्रएवढ्या खोलीचा . अर्थात उंची होतीच पहिल्यापासून पण कुणाला दिसली नव्हती . अर्थात चिरपरिचित असल्यानं ती कुणाला जाणवली नव्हती . […]
श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ४१
या आणि यापुढच्या श्लोकांमध्ये भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज भगवान श्रीहरीच्या भुवयांचे वर्णन करीत आहेत. त्या अत्यंत नयनमनोहर असणाऱ्या आणि हृदय आल्हादक अशा पद्धतीच्या हालचाल करणाऱ्या भुवयांचे वैभव सांगताना आचार्य श्री म्हणतात, […]
पत्रप्रपंच – जेष्ठ नागरिकांच्या ‘पत्ररूपी’ मनोव्यवहारांचा परिचय
2017 साली प्रसिद्ध झालेले हे पुस्तक मी वाचले होते आणि मला ते भावले होते. पण ‘कोविद’ १९, च्या महामारीत, माझे , मीच कपाटात ठेवलेल्या पुस्तकाकडे लक्ष गेले. आतुरतेने मी ते पुन्हा उघडले. भावनांचा आणि विचारांचा पूरच माझ्या मनात वाहू लागला. काळाच्या उदरात विलय होऊ पाहणाऱ्या या पुस्तकाला उजेडात आणले तर ‘पत्रे’ लिहिणाऱ्या या ‘सिनिअर’ सिटिझन्स’ना न्याय मिळेल या हेतूने याचे परीक्षण करण्याचा हा ‘प्रपंच’! […]
नदीवरील बांध
विषण्यतेने बघत होतो भिंतीवरच्या खुणा काळ जाऊन वर्षे लोटली आठवणी देती पुन्हा बसत होतो नदीकांठी बालपणीच्या वेळी पात्र भरुनी वहात होती गोदावरी त्या काळी सदैव पूर येउनी तिजला गावास वेढा पडे गांव वेशीच्या घरांना मग पाण्याचे बसती तडे चित्र बदलले आज सारे पात्र लहान होई बांध घातला धरणावरी पाणी अल्पसे येई खिन्नपणे खूप भटकलो भोवतालच्या भागी चकित झाले मन बघूनी हिरवळ जागोजागी इच्छित दिशेने पाणी वाही बांध घातल्यामुळे सारे जीवन प्रफुल्ल करीं आनंदमय सगळे डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० […]
श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ४०
प्रस्तुत श्लोकात आचार्य श्री भगवान श्रीहरीच्या अद्वितीय नेत्रकमलांचे वर्णन करीत आहेत.ते म्हणतात, […]
शंकर मुडके!
सकाळचे ते ‘गोल्डन अवर्स’ होते. पहिला चहा झाला होता. लोखंडी गेटच्या बेचक्यात, पेपरवाल्या पोराने खुसून ठेवलेला पेपर, मी काढून घेतला. चारदोन ठिकाणी हुडकल्यावर चष्मा सापडला आणि तो नाकावर चढवून, पेपर पालथा घातला आणि वाचायच्या विचारात होतो. हो, मी पेपर मागच्या पानापासूनच वाचायला सुरुवात करत असतो! “काय? सुरेशअण्णा हैती का घरात?” मी एकदम दचकलोच. […]