किती दिवसात..
किती दिवसात पावसाच्या सरीत चिंब भिजलेच नाही. रिमझिम रेशीमधारा आणि गोल गारामणी झेललेच नाही… किती दिवसात पागोळ्यांचे मणी ओंजळीत धरलेच नाही. आणि पत्र्याच्या तडमताशाचे आवाज ऐकून ताल धरलाच नाही… किती दिवसात कागदी बोट पाण्यात सोडून दिलीच नाही. आणि लांबवर जाऊन पाण्यात दूरवर गेलेली पाहिलीच नाही…. किती दिवसात भिजलेले केस कोरडे केलेच नाही. चुलीपाशी बसून आईच्या हातचा […]