“चोचीतले दाणे”
समीरचं लग्न होऊन सहा महिने झाले होते. तो शहरातील एका मोठ्या प्रिंटींग प्रेसमध्ये कामाला होता. घरात आई, वडील आणि हे दोघं असं चार जणांचं कुटुंब. त्याच्या पाच वर्षांच्या कामाच्या कौशल्यावर खुष होऊन प्रेसचे मालकांनी त्याला सिनीयर ऑपरेटरची पोस्ट दिली होती. समीर सकाळी नऊ वाजता घरुन निघायचा. दिवसभर उभं राहून काम केल्याने दमून संध्याकाळी सहा वाजता परतायचा. […]