नवीन लेखन...

आयुष्याच्या वाटेवर काटे अनेक येतात

आयुष्याच्या वाटेवर काटे अनेक येतात, कठीण प्रसंग येता मग स्वामी मार्ग दाखवितात.. येते हमखास प्रचिती कळत नाही काही तेव्हा, लीला असते स्वामींची ही आशीर्वाद असतो तो तेव्हा.. होतील चुका अनेक जीवनात पुन्हा पुन्हा, स्वामी घेतील पदरात दुःख दूर करतील तेव्हा.. नको राग नको लालसा स्वामींची होता कृपा, मन होईल प्रेमळ,निर्मळ आपोआप आपुले तेव्हा.. काय असेल ती […]

ब्लॅक फ्रायडे

१९५०-६०च्या दशकात यूएसमध्ये ब्लॅक फ्रायडेला त्याचे नाव मिळाले जेव्हा फिलाडेल्फिया पोलीस विभागाने थँक्सगिव्हिंग आणि आर्मी-नेव्ही गेम्समधील दिवसाचा संदर्भ देण्यासाठी “ब्लॅक फ्रायडे” हा शब्द वापरला. तेव्हा शुक्रवार दिवस होता जेव्हा मोठ्या संख्येने लोकं शहरात खरेदी करत होते आणि गर्दी आणि समोरून येणाऱ्या वाहतुकीला तोंड देण्यासाठी पोलिसांना तासनतास कसरत करावी लागली. […]

कृष्णसखी

थांब थांब मोहना, आर्त वेणू वाजवू नकोस तुझ्याचसाठी वेडी ही , अजून तिला भारू नकोस थांब जरा मोहना, असा मल्हार छेडू नकोस होऊन जाईल चिंब धरणी, का उसंतही देऊ नकोस? थांब जरा मोहना असा तू नाचू नकोस मनीच्या या झंकारल्या तारा, अजून त्या तोडू नकोस थांब आता मोहना असा तू बहरू नकोस भरल्या या तरुवर आता […]

भारतीय राज्य घटना दिवस

त्रिमंत्री योजनेनुसार १० लाख लोकांमागे एक अशा प्रमाणात प्रतिनिधींची निवड करण्यात येऊन घटना परिषदेची निर्मिती झाली. या परिषदेमध्ये सर्वसामान्य २१० मुस्लीम ७८ शीख ४ इतर ४ अशा २९६ प्रतिनिधींची निवड करण्यात आली. […]

ह्या शांत कृष्णा काठी

ह्या शांत कृष्णा काठी मन एकचित्त घाटावरी, राऊळे निनादे घंटा मन प्रसन्न होईल तेव्हा.. मन होईल अवखळ वेल्हाळ कृष्णेच्या काठी अल्लड, बालपण सरसर आठवून अंतरी सुखद क्षण हरवून. किती पाहू डोळा भरुनी सुखद दिसेल निसर्ग भवती, मन भरुन राहतील आठवणी सुंदर असेल ही स्वर्गीय अनुभूती.. — स्वाती ठोंबरे.

ताई

आज ती येऊन गेली पोटातली माया ठेऊन गेली इतक्या दिवसांच पोरकेपण क्षणात सार मिटवून गेली आज ती येऊन गेली भाच्याला पापा देऊन गेली खेळणी आणि पैसे थोडे खाऊसाठी देऊन गेली आज ती येऊन गेली सासर माहेरचं बोलून गेली तिच्या माझ्यातलीच काहीं गुपिते मनामनामध्ये साठवून गेली. आज ती येऊन गेली हळदीकुंकू घेऊन गेली तोंडभरून आशीर्वाद अन घर […]

उसवलेले जोडे

हिंदी कलाकारांची उदाहरणं देण्याचा उद्देश असा की, सर्वसामान्य माणसाला असं वाटतं.. यांच्याकडे पैसा, प्रसिद्धी, मालमत्ता सर्व काही आहे. यांना कशाची कमतरता? प्रत्यक्षात तसं नसतं. ही माणसं त्यांच्या खऱ्या जीवनात दुःखी, कष्टीच असतात. जणूकाही ‘उसवलेले जोडे’…. […]

दासगणू महाराज

त्यांनी निर्माण केलेल्या ग्रंथांपैकी अमृतानुभव भावार्थमंजिरी, पासष्टीभावार्थदीपिका, श्रीगुरूचरित्र सारामृत, श्रीगोदा महात्म्य, श्रीगौडपादकारिका, श्रीईशावास्य भावार्थबोधिनी व मंत्रार्थप्रकाशिका, श्रीनागझरी महात्म्य, श्रीनारद-भक्तिसूत्र-बोधिनी, श्रीमध्वविजय, श्रीमांगीशमाहात्म्य, श्रीशनिप्रताप, श्रीशंडिल्यभक्तिसूत्र भावदीपिका हे प्रमुख ग्रंथ त्यांच्या उत्तुंग काव्यप्रतिभेची साक्ष पटवितात. […]

प्रसिद्ध लेखिका डॉ. वीणा देव

त्यांनी गो. नी.दांडेकर यांच्यावर लिहिलेल्या ‘आशक मस्त फकीर’ या व्यक्तिचित्रास महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट ललित साहित्य निर्मितीचा पुरस्कार मिळाला. तसेच महाराष्ट्र शासनाच्या मराठी राजभाषा सल्लागार समितीच्या त्या माजी सदस्य राहिल्या आहेत. […]

मुंबईवरील दहशतवादी हल्याची तेरा वर्षे

पकडला गेलेला एकमेव दहशतवादी, अजमल आमीर कसाब, हा २६ नोव्हेंबरलाच पोलिसांच्या तावडीत जिवंत सापडला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व हल्लेखोर पाकिस्तानी होते, व या हल्ल्यांमागे लष्करे तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात होता. […]

1 48 49 50 51 52 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..