नवीन लेखन...

शोधू पुस्तकात भिमाला

शोधू पुस्तकात भिमाला घेऊ मस्तकात भिमाला ||धृ|| निसर्ग न्यायाने वागला पाणी पाजताना गर्जला असा महामानव जाहला तळपत्या सूर्याने पाहिला ||१|| देह लेखनीत झिजला अश्रू पापणीत टिपला संविधानी कायदा केला पाईक समतेचा झाला ||२|| हुंकार वेदनेचा साहिला न्याय बहुजनां दिधला माय दुबळ्यांची झाला नेता जगी असा पहिला ||३|| शिकण्याचा मार्ग चांगला संघटन गुण शिकविला संघर्ष अंगार पेटविला […]

धनश्री लेले, एक विद्वान व्यासंगी विदुषी

आज मी ज्या एका लेखिका, रसाळ निवेदिका, उत्कृष्ट वक्त्या, संस्कृत भाषा आणि साहित्याच्या , तसंच संतसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक,  विविधांगी आणि व्यासंगी व्यक्तिमत्व, विदुषी धनश्री लेले यांचं शब्दचित्र माझ्या कुवतीनुसार मांडणार आहे, त्यातला त्यांचा रसाळ निवेदक हा पैलू मला खूप जवळचा आहे.  त्यातलं रसाळ सोडून फक्त निवेदन या क्षेत्रातला मी ही एक अगदी बारीकसा ठिपका आहे. […]

लढा सीमेचा – लढा अस्मितेचा !! (भाग ९)

सीमाभागातील मराठी माणूस मात्र महाराष्ट्राकडे नि दिल्लीतील मराठी नेत्यांकडे आशाळभूतपणे पहात राहीला नि अजूनही पहातोच आहे. सीमाप्रश्नाचे गांभिर्य केंद्राला कधी वाटलेच नाही. त्याचा नेमका फायदा कर्नाटकाने उचलला. बेळगावची एक इंच भूमीही कर्नाटकाला देणार नसल्याची दुर्योधनी दर्पोक्ती ते करू लागले. […]

बाबासाहेब उपाख्य बमो….

मी पाहताक्षणी त्यांना ओळखले- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ! पुढे आलेल्या व्यक्तीजवळ एक पिशवी होती आणि तिने अजीजीने सर्वांना विनंती करायला सुरुवात केली – ” अहो, यांना ओळखलं कां ? हे बाबासाहेब पुरंदरे ! पुण्याला निघाले आहेत. कृपया त्यांना बसायला जागा देता कां ?” […]

चहा

लवंग, आले दालचिनीचा सुगंध सारा भरून घ्यावा डोळे मिटूनि निवांत रेलून घोट चहाचा हळूच घ्यावा वेळ असो दुपार तीनाची की पहाटेचा असो गारवा चहास का लागे निमित्त कोणते? कधीही द्यावा कधीही घ्यावा चाहते असे चहाचे मिळता योग दुर्मिळ जुळून यावा स्थळकाळाचे बंधन सोडून मस्त गप्पांचा फड रंगावा मात्र एकट्या सांजवेळी घोट चहाचा हळूच घ्यावा पापणीतल्या सुखस्वप्नांना […]

सावलीपासून वीज!

सौरऊर्जेशी आपला व्यवस्थित परिचय आहेच. यात सूर्यकिरण विशिष्ट प्रकारच्या पट्ट्यांवर पडल्यावर वीज निर्माण होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता सावलीपासून अशी ऊर्जा निर्माण करणे शक्य झाले आहे. अर्थात अशा प्रकारे ऊर्जा निर्माण करण्यासठी सावलीबरोबरच प्रकाशाचीही गरज असते. सावलीपासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या या साधनाचा काही भाग हा सावलीत ठेवलेला असतो, तर काही भाग हा प्रकाशात असतो. सौरऊर्जा […]

वॉशिंग मशीन… एक लावणे !

“आज धुणारायस का रे कपडे” ? बायकोने नेहमीप्रमाणे मला न आवडणारा प्रश्न विचारला.  कपडे धुणारायस का ? कसं वाटतं ते !  म्हणजे मोरीत बसून मी धोका हातात घेऊन कपडे बडवतोय , असं चित्र डोळ्यासमोर येतं.  […]

अंगावरची यंत्रं

सुरुवातीला संगणक प्रचंड मोठा होता, मोठमोठ्या खोल्या भरून जायच्या, त्यानंतर तो टेबलावर आला, नंतर तो मांडीवरचा संगणक बनला, मग हातात मावेल एवढा छोटा झाला; आणि आता तर तो आपल्या अंगावर मिरवायला लागलाय. आपली महत्त्वाची कामे असोत, आपल्या ज्ञानात वृद्धी करायची असो, की आपले मनोरंजन करायचे असो, हे सगळे आता ही संगणकावरील आधारित अंगावरची यंत्रं करताहेत. यांचीच माहिती देतोय हा लेख… […]

मनाच्या तळ्यात कितीक सल भिजले

मनाच्या तळ्यात कितीक सल भिजले दाटले उमाळे भाव निःशब्द गहिरे साचले अश्रू खोल गहिऱ्या जाणिवांचे डोळ्यांत अश्रुंचे ओंथबले पाट कित्येक ओले काहूर मन कितीक कढ अंतरी मिटवले वणवा पेटतो वनी पानांचे हिरवेपण जळते मेलेल्या भावनेत नवं संजीवनी न येते पसरुनी वणव्यात दाह करपून होरपळे न फुलतो वसंत बहरात कधी कुठे न पाने फुले मोहरुन न पुन्हा […]

1 49 50 51 52 53 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..