नवीन लेखन...

चंद्रलेखा नाट्यसंस्थेचा वर्धापनदिन

चंद्रलेखा हे खरे तर नाटककार वसंत कानेटकरांच्या मुलीचे नाव.त्यांनीच हे नाव वाघांना सुचवले आणि ही नाट्यसंस्था जन्माला आली. पुढच्याच महिन्यात ७ डिसेंबर १९६७ रोजी ‘गारंबीचा बापू’ ह्या नाटकाने ‘चंद्रलेखा’ची सुरुवात झाली. […]

वात

गळे अवसान सारे फुटे कणसाला तुरे चुलीत घाला तुमचे वांझ दौऱ्यावर दौरे! कापसाच्या होई वाती विम्याचं रिकामे पोते निवडून दिलेले घोडं कंपन्याची पेंड खाते ! खतात लूट,बियांत लूट आडत्याचीही दलाली खरेदीखताला बघा महागाई लावी लाली ! कोपतो प्रत्येक ऋतू तशी काळी अवकाळी पीठ मीठ भाकरीचं शिक्षण धरी काजळी! बनिया येती घरा तेव्हा बटनी मतदान करा निवडून […]

अणूरसायनशास्त्रज्ञ प्रा. डॉ. हरी जीवन अर्णीकर

रसायनशास्राच्या अध्यापनात मौलिक सुधारणा करण्यासाठी ‘युनेस्को’ने त्यांची ‘पायलट प्रोजेक्ट ऑन टीचिंग केमिस्ट्री’ या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय सल्लागार म्हणून नेमणूक केली होती. कृत्रिम किरणोत्सर्गाच्या शोधाला ५० वर्षे पूर्ण झाल्यामुळे त्यांनी १९८५ साली भाभा अणू संशोधन केंद्र यांच्या सहकार्याने एक भव्य आंतरराष्ट्रीय चर्चासत्र यशस्वीपणे पार पाडले होते. […]

शिटीच्या भाषा

शिटीचा आवाज किती दूरपर्यंत पोचेल हे त्या-त्या परिसरावर अवलंबून असतं. घनदाट जंगलात हा आवाज सुमारे अर्ध्या किलोमीटरपर्यंत पोचतो तर, डोंगराळ भागातल्या काही ठिकाणी तो तब्बल आठ किलोमीटरपर्यंतही पोचू शकतो. […]

नारळीकर आणि मराठी विज्ञान परिषद

डॉ. नारळीकर १९७२ मध्ये भारतात आले आणि लगेचच त्यांचे मराठी विज्ञान परिषदेबरोबर जे गहिरे नाते जुळले ते आजपर्यंत अबाधित आहे एव्हढेच नाही तर आता चांगलेच मुरले आहे. याच ह्रद्य नात्याच्या प्रवासाचा स्मरणरंजनात्मक आढावा घेतलाय या लेखात श्री. अ. पां. देशपांडे यांनी. […]

प्रीतिज्योत

सखे कसे सांगू शल्य अंतरीचे श्वास तुजसाठी व्याकुळ आहे नित्य आलिंगीतो तुला अंतरात मन हळवे तुजसाठी झाले आहे तुझ्या आठवांचे ओघळ लोचनी सभोवती तुझाच सारा भास आहे विरहात तव अस्तित्वाची सुखदा मी ,आजही मौनात भोगतो आहे स्मरती बकुळफुलांच्या ओंजळी तव स्पर्शाठवात मी गंधतो आहे प्रारब्ध ! भोगले दैवयोग समजूनी सांजवेदीवरी दर्शनाची आंस आहे आज याविण दूजी […]

आफ्रिकेचे बिअर आख्यान

‘केनिया बिअर’चा संस्थापक जॉर्ज हर्स्ट एके दिवशी शिकारीला गेला असतांना त्याला एका हत्तीने ठार मारले. जॉर्जच्या स्मरणार्थ बिअरला ‘टस्कर’ नाव दिले. ही बिअर इतकी लोकप्रिय झाली की इंग्लंडच्या सुपरमार्केटमध्ये ती २००८ सालापासून विक्रीसाठी अवतरली. […]

गरीबाची लालपरी

तांबडं फुटताच गाडी यायची आमच्या फाट्याला सुरूवात व्हायची सडा सारवणाला अन् वेग यायचा जात्याला लहानपणी मांडीवर बसल्यामुळे तिकिट नाही काढायचे शिटावर बसण्यासाठी आम्ही मात्र रडायचे गरीब श्रीमंत करीत नव्हती कसलाच भेदभाव मार्गावरला एकही सुना सोडत नव्हती गाव वृद्ध ,अपंग व महिलांना जागा असायची राखीव आदर करावा सर्वांचा करून द्यायची जाणीव माळरान,डोंगरदऱ्या तुडवीत जायची सुखरूप घेऊन पडत्या […]

‘मीरा’ – उपेक्षित नाममुद्रेची उपेक्षा !

ऐतिहासिक पुराव्यां अभावी एक सर्वमान्य निष्कर्ष असा आहे की – मीरा कृष्णभक्त होती , तिने कृष्णभक्तीपर रचना केल्या (ज्या कधींच्याच अक्षर वाङ्मयांत सामील झालेल्या आहेत) आणि ती नि:संशय भक्ती संप्रदायातील एक महत्वाची संत कवयित्रीं होती. गुलजारसारख्या अंतर्बाह्य कवीला यापेक्षा अधिक काय हवे? […]

1 53 54 55 56 57 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..