नाट्यपंढरीचा वारकरी
महाराष्ट्र विद्यालयातील आठवीचा वर्ग. मराठीच्या शं. रा. देवळे सरांचा तास होता. आदल्या दिवशीच सरांनी सर्व विद्यार्थ्यांना निबंध लिहून आणायला सांगितला होता. विषय दिला होता, ‘तुमचा आवडता लेखक.’ सर वर्गात येऊन बसले. वर्गावर एक नजर फिरवली व म्हणाले, ‘प्रत्येकाने पुढे येऊन आपला निबंध वर्गाला वाचून दाखवा’. एकेकजण पुढे येऊन वेगवेगळ्या लेखकांवर लिहिलेले निबंध वाचून जात होता. एकाचाही […]