नवीन लेखन...

गेले द्यायचे राहून…..

स्वतःच्या केबिन मध्ये अनय शांतपणे बसून होता. त्याला कारणही तसंच काहीसं होतं पैसा, पॉवर, स्टेटस मिळवताना खूप काही निसटून गेलं होतं. वळून मागे बघितल्यावर त्याला जाणवलं की या सगळ्या चढाओढीत आपण आपल्या माणसांना हरवून बसलोय. […]

लवंगांच्या वृक्षांनी डवरलेले झांझीबार

भारतीय, चिनी आणि आता पाश्चिमात्य पारंपारीक आयुर्वेद शास्त्रात लवंगेला मानाचे स्थान लाभले आहे. विशेषतः दंतविज्ञान शास्त्रात दाताच्या दुखण्यावर लवंगेचा वेदनाशामक म्हणून सर्रास उपयोग होतो. त्यामुळे दंतदाह कमी होतो. पचनकारी औषधे-पेयात लवंगेचा उपयोग आलाच. चीन व भारतात मूत्राशयातील अस्वास्थ्य, पोटदुखी, तीव्र खोकला, अतिसार, ओकार्‍यांना प्रतिबंध यासारख्या अठरा दुखण्यांसाठी लवंगेचा वापर होतो. […]

दैनिक मराठाचा चा वर्धापन दिन

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्या५साठी साप्ताहिक ‘नवयुग’ कमी पडू लागले म्हणून शिवाजी पार्कच्या सभेत मे १९५६ मध्ये सेनापती बापट यांनी आचार्य अत्रे यांना सुचवले की, लढा यशस्वी करायचा असेल तर एक दैनिक सुरू करा. आचार्य अत्रे यांनी घोषणा केली, ‘१५ नोव्हेंबरपासून ‘मराठा’ नावाचे दैनिक सुरू करेन.’ […]

सचिनचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण

इंग्लंडमध्ये १९९० साली ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात त्याने यजमानांबरोबरच्या कसोटी सामन्यात पहिले शतक झळकावले होते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक फटकावण्याचा मानही सचिनच्याच नावावर आहे. १९९९ साली सर डॉन ब्रॅडमन यांनी सचिनवर स्तुतिसुमनांचा वर्षांव करत त्याला भेटीसाठी बोलावले होते. […]

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचा वर्धापनदिन

रोजगाराभिमुख नवे अभ्यासक्रम स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन हे तर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे वैशिष्ट्य आहे. संस्थेतून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्याला इंग्रजीबरोबरच एखाद्या पाश्चात्य भाषेचे ज्ञानही गरजेचे आहे. जर्मन भाषेचा सुरू झालेला वर्ग आज रत्नागिरीतील पहिला आणि एकमेव ठरला आहे. […]

‘आज सोचा तो…..’ – वाताहतीचे अर्काइव्ह !

“आत” मध्ये कोलाहल सतत सुरु असतात. दरवेळी नव्या सूर्याच्या स्वागताला बाहेरच्या अंगणात जाणं जमतंच असं नाही. तो सूर्यही तसा झाकोळलेलाच असतो. मागच्या परसदारातील किंचित काळोख्या तुळशीवृंदावनापाशी तिचा संयत सूर सापडतो. काल-परवा घडून गेलेल्या, पुसट न झालेल्या काळाच्या गोधड्या पुकारत असतात आणि त्यांच्या घट्ट उबेत बरंच काही पुनःपुन्हा साचत असतं, सापडतही असतं. […]

मायेची ओवाळणी

उत्सव हा नात्यांचा असतो पण आता नातीच टिकत नाहीत तर उत्सव कसला आणि उत्सवासाठी उत्साह कुठला. […]

ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर

मंगेश तेंडुलकर हे अखेरपर्यंत कार्यरत असणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. मंगेश तेंडुलकर यांनी ९० हून अधिक व्यंगचित्र प्रदर्शन आयोजीत केली होती. स्वतःचा मृत्यू या विषयावरही त्यांनी व्यंगचित्रांची मालिका बनवली होती. […]

कुठल्या वाटेवर या

कुठल्या वाटेवर या पाऊल अलगद पडते ही वाट कुठे हरवून अनामिक मग होते.. फुलतील फुलांचे मळे फुलपाखरे फुलात बागडे गंधित मन होईल अलगद सुवास अंतरी मोहक दाटे.. ही वाट अशी मग चालता रमते क्षणभर मन हसरे बावरे पाहूनी निसर्ग फुलतील गात्रे नयनी साठविते हे फुलांचे ताटवे.. किती किती मन हरखून जाई सुखद क्षण आनंद हृदयात भावे […]

1 62 63 64 65 66 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..