अर्थ जीवनाचा
ऋणानुबंधी! नाते हे गतजन्मांचे अलवार, उमललेले जीवाजीवांचे जसे दृष्य लोचनी क्षणाक्षणाला क्षितीजावरती! मिलन नभधरेचे अनाकलनीय! सारेच रूप सृष्टीचे अस्तित्व! सप्तरंगलेले दयाघनाचे मुक्त खळखळणारी सरिता निर्मल तांडव! सरोवरी महाकाय लाटांचे अलौकिक! सारीच साक्ष लाघवी मनोहारी अवीट नजारे ऋतुऋतूंचे मृदगंधी गंधाळुनी जातो जीव सारा सरितेचे, निर्मल तरंग सारेच प्रीतीचे आत्ममुखता! हाच अर्थ जीवनाचा सांगुनी जाते, ते भ्रमण ऋतूचक्रांचे […]