आझाद हिंद सरकारचा स्थापना दिन
आधुनिक भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात आझाद हिंद सैन्याने केलेले बलिदान महत्त्वाचे आहे. कारण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नेताजींनी एक लढाऊ सेना उभी केली आणि या सैन्याने इंग्रजांच्या सैन्याला चांगले तोंड दिले. त्यामुळे इंग्रज सरकारने ज्यावेळी आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना पकडून त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचे खटले सुरु केले, त्यावेळी संपूर्ण देशभर त्यांना पाठिंबा देण्यासाठी लोक रस्त्यावर आले. […]