नवीन लेखन...

बाजार

उभी कोपऱ्यात शहराच्या, ती वस्ती लाल दिव्याची. अभिशाप भोगत असते, रात्रीच्या अभिसाराची. सकाळ होई दुसऱ्या प्रहरा, शीण कायेचा तो सारा. अंमल वारुणीचा असे अजूनही, वस्त्रांचे भान ते नसे जराही. झटकुनी दुखऱ्या देहाला कोनी, कवळिती तयांना छातीशी धरूनी. बिलगती कुस मिळे मायेची, कसर रात्रभराच्या विरहाची. स्नान करूनी हात जोडुनी, देवाला सजविती फुलांनी. करेल काय?निराकार तो ही, चुरगळा […]

बिझिनेस स्त्री-पत्रकार सुचेता दलाल

सुचेता दलाल या पहिल्या बिझिनेस स्त्री-पत्रकार. नवं जाणून घेणं, तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि घटनांचे अन्वय लावण्याची चिकित्सक वृत्ती, संदर्भ गोळा करत,‘ता’वरून ‘ताकभात’ ओळखत त्यांनी अनेक ‘बातम्या’ मिळवल्या, प्रसिद्ध केल्या. त्या मध्ये एन्रॉनसारखे ऊर्जा घोटाळे, दिनेश दालमियां सारख्यांनी आय.टी. कंपन्यांच्या शेअर्समध्ये केलेले घोटाळे, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन मधील गडबडी उघडकीस आणल्याच, परंतु त्यांनी ५०० कोटी रुपयांचं ‘बिग बुल’ प्रकरण उघडकीस आल्याने इतिहास घडवला. […]

जीवनाच्या वाटेवरचे

डीके आजोबा ही वल्ली आमच्या आयुष्यात तशी अचानकच आली. डीके हे त्यांचं आडनाव. त्याचं झालं असं, सूर नवा ध्यास नवा हा बालगायकांचा रिऍलिटी शॊ सुरु होता त्याचं चित्रीकरण मीरा रोड इथल्या स्टुडिओत सुरु होतं. एकदा माझ्या एका परिचितांचा फोन आला की तुम्हाला चित्रीकरण पाहायला जायचं असल्यास डीके आजोबा घेऊन जातील. […]

दिव्यांग विठ्ठल अण्णा

मागील आठ वर्षांतील दिव्यांग निधीचा दोन कोटी उत्पन्नाच्या प्रमाणात मागील तीन वर्षांत 5% आणि पाच वर्षांतील 3% प्रमाणे साठ लाख रुपयांचा हिशोब द्या, नाहीतर गावातील वीस दिव्यांगांच्या बँक खात्यात प्रत्येकी तीन तीन लाख जमा करा. अन्यथा साठ लाख रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी शिक्षा भोगायची तयारी ठेवा असे ठणकावून अण्णा बाहेर पडले. […]

बुद्धीदेवता श्री गणेश – शारदानाथ

देवी शारदेचे भगवान श्री गणेशांसह मीलन होते अक्षय तृतीयेला. त्या दिवसाला गाणपत्य संप्रदायात शारदेशमंगल असे म्हणतात. जिच्या उपासनेने भगवान गणेशांची अक्षय्य कृपा प्राप्त होते त्या शारदेच्या प्रियतम असणाऱ्या भगवान गणेशांना तिच्याच नावाने श्री शारदानाथ असे म्हणतात. […]

हॉलीवुडचे प्रख्यात कथाकार, पटकथाकार सिडने शेल्डन

त्याने आपल्या ओघवत्या शैलीने अनेक कादंबऱ्या लिहुन अक्षरशः जगाला वेड लावले आणि चार्ली चॅप्लिनच्या चित्रपटाशी स्पर्धा असताना, त्याला सर्वोत्कृष्ट कथेसाठी ऑस्कर एवॉर्ड मिळाला. […]

सर्जन डॉ.नित्यानंद उर्फ नितु मांडके

त्यांची काम करण्याची उरक व अचुकता पाहून त्यांना ‘सुपरफास्ट’ हे नाव पडले. डॉक्टर नितु मांडके हे अतिशय कार्यक्षम सेवातत्पर प्रसंगावधानी व सर्वच रूग्णांबद्दल समान आत्मीयता व तळमळ असलेले जणु देवदुतच होते. अनेक जणांना त्यांनी मृत्युच्या दाढेतुन बाहेर काढले आहे. […]

एफ. एम. रेडिओचे संशोधक ई एच आर्मस्ट्राँग

आर्मस्ट्रॉंगनं डेव्हिड सारनॉफच्या साथीत अनेक संशोधनं केली. त्यांनी मिळून पहिला ‘पोर्टेबल’ रेडिओसुद्धा बनवला. त्यांच्या कंपनीतल्या एका सेक्रेटरीशीच आर्मस्ट्रॉंगनं लग्न केलं. यानंतर आर्मस्ट्रॉंगचा द फॉरेस्टशी पेटंटवरून लढा सुरू झाला. खरं म्हणजे द फॉरेस्टचा यात पराभव होईल असं वाटत होतं. कारण द फॉरेस्टनं सांगितलेल्या काही गोष्टी आणि कागदपत्रांमधल्या नोंदी तसंच साक्षीदारांची जबानी या सगळ्यांमध्ये खूप तफावत होती. […]

संधी गवसली त्याने मारीला

हुशार, धेय्य वेडा, जिगरबाज व्यक्ती नेहमीच यश संपादन करतो पण, या सगळ्या बरोबर जर समयसुचकता, प्रसंगावधान आणि योग्य संधीची उकल असेल तर यशाबरोबर समाधान सुद्धा प्राप्त होऊ शकते. […]

अवतार मेहेरबाबा

समाधी मंदिरावर मंदिर, मशीद, क्रूस व अग्निपात्राची प्रतिकृती आहे. जणू सर्व धर्माचं संचित इथे आहे! आतील भिंती व घुमटाच्या आत मेहेरबाबा व भक्तांची चित्रं रेखाटण्यात आली आहेत. समाधी मंदिराचा लाकडी उंबरठा ओलांडला की, समोर दिसतं मेहेरबाबांचं स्मितहास्य करणारं तैलचित्र. […]

1 2 3 4 40
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..