क्षण हरविलेले
जरा विसावुया! क्षणभर येथे स्मरुया , क्षणक्षण हरविलेले आणि सावरू! क्षण उरलेले जरा विसावुया! क्षणभर येथे ।।१।। आठवांना! किती उसवावे उलगडतांना सुख,दु:खांना लोचनांनी किती ओघळावे जरा विसावुया! क्षणभर येथे ।।२।। आयुष्य सारेच रंगलेभंगलेले तरीही आपण जगलो विवेके दयाघनाची , ती ईच्छया सारी आता विसावुया! क्षणभर येथे ।।३।। प्रीतच आपुली , ऋणानुबंधी स्पंदनी! नित्य उमलुनी येते गंधाळुनी […]