मार्लेश्वर यात्रा
दरवर्षी संक्रातीला लाखो भक्त देवरुखजवळील मार्लेश्वराच्या यात्रेला जमतात. आज रात्री मार्लेश्वरची पालखी, आलेल्या दिंड्या यजमान आणि मानकऱ्यांसह शिखराकडे प्रयाण करतील. १४ जानेवारीला पहाटे साखरपा येथील गिरीजादेवीच्या पालखीचे मानकऱ्यांसह आगमन झाल्यावर मुलगी पाहणे, पसंती, मागणी टाकणे, मानपान असे विधी संपन्न झाल्यावर १४ जानेवारीला(संक्रातीच्या दिवशी) दुपारी १२ नंतर श्री देव मार्लेश्वर आणि गिरीजादेवी यांचा विवाहसोहळा मंगलाष्टकांच्या साथीने मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे. […]