January 2022
ठाणबंद वाचक-लेखक आणि साहित्य ऑनलाईन
ठाणबंदीच्या काळात लोकांना स्वतच्या जीवनशैलीतील बदलांना सामोरे जावे लागले. यातील सर्वात लक्षणीय बदलांपैकी एक म्हणजे आपण माध्यमांचा वापर कसा करतो आणि विशेषत आपण कसे वाचतो, याकडे पाहिले पाहिजे. […]
भूतांपरस्परे जडो (माझी लंडनवारी – 12)
आठ-सव्वाआठची वेळ असेल, मी परत एकटीच गाणी ऐकत बसले होते आणि अचानक दारावर पुन्हा टकटक झाली. दार उघडले तर संतोष आणि अजून दोन अनोळखी चेहरे दारात उभे! मग संतोष आत आला. […]
नाट्यदर्पण रजनी चालवणारे सुधीर दामले
नाट्यदर्पण’चे सुधीर दामले हे त्याकाळी ‘नाट्यदर्पण’ नावाचे एक मासिकही चालवत असत. त्याला जोडून त्यांनी १९७५ साली ‘नाट्यदर्पण रजनी’ सुरू केली होती. मराठी नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातल्या विविध कलाकारांना त्या सोहळ्यात पुरस्कार दिले जात. हिंदी सिनेमाच्या क्षेत्रात ‘फिल्मफेअर ॲवॉर्ड्स’चे जे स्थान आहे तेच मराठी कलाजगतात या ‘नाट्यदर्पण सन्मानचिन्हां’ना मिळाले होते. […]
कोकणची माती आणि तिचे संरक्षण
कोकणच्या मातीमध्ये रुजणारे हे सर्व वृक्ष या भागाला समृध्दी तर देतीलच पण वृक्षांच्या उत्पादनावर आधारित शेकडो कुटिर उद्योग कोकण भूमीला स्वयंसिद्धतेकडे स्वावलंबनाच्या महाद्वारामधून घेऊन जाऊ शकतात. कोकणच्या मातीचे संरक्षण करावयाचे असेल तर या भूभागाचा विकास तेथील निसर्गाला बरोबर घेऊनच करावयास हवा. […]
ज्येष्ठ गायक, अभिनेते रामदास कामत
‘मत्स्यगंधा’ नाटकातील ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’ हे कामत यांचे ध्वनिमुद्रित झालेले पहिले गाणे. त्यांनी गायलेली ‘आकाशी फुलला चांदण्यांचा मळा’, ‘देवा तुझा मी सोनार’, ‘निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे’, ‘पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव’, ‘वाटे भल्या पहाटे यावे’, ‘हे आदिमा हे अंतिमा’, ‘विनायका हो सिद्ध गणेशा’, ‘हे गणनायक सिद्धिविनायक’, ‘हे शिवशंकर गिरिजा तनया’ आदी भावगीते, चित्रपट गीतेही लोकप्रिय आहेत. तसेच रावणकृत शिवतांडव स्तोत्र हे रामदास कामत यांनी खड्या आवाजात गायलेले आहे. […]
लेखक निरंजन घाटे
प्रामुख्याने विज्ञान विषयावर लिहिणाऱ्या घाटे यांनी एकीकडे स्त्री-पुरुष आकर्षणाचा शास्त्रोक्त वेध घेणाऱ्या ‘प्रेम, स्पर्श आणि आकर्षण’ किंवा सेक्सबद्दल गैरसमज दूर करणाऱ्या ‘सेक्सायन’सारख्या पुस्तकांबरोबरच, दुसरीकडे युद्धकथा सांगणाऱ्या ‘रणझुंजार’ आणि लोकप्रिय लेखकांच्या आत दडलेल्या काही विक्षिप्त आणि विचित्र स्वभावाच्या माणसांवर प्रकाश टाकणारं ‘लोकप्रिय साहित्यिक’ सारखी पुस्तकंही लिहिली आहेत. […]
ज्ञानवृक्षाखालील स्वरवृक्ष !
भुसावळची तापी,सांगलीची कृष्णा, ऋषिकेशची गंगा, नाशिकची गोदावरी अशा नद्यांच्या तीरी उभे राहण्याचे अनेक प्रसंग माझ्यावर आलेत. शेवटी नदीचे ” नदीपण ” तिच्या प्रवाही असण्यात असते. तद्वत ” जयपूर ” असो, वा “किराणा ” किंवा “आग्रा ” घराणे असो , संगीतात प्रवाहीपण आहे का हे माझ्या दृष्टीने महत्वाचे ठरते. […]
ज्येष्ठ इतिहासकार ग. ह. खरे
ग ह खरे सुमारे २०,००० पोथ्या, ५००० नाणी, १५० चित्रे आणि ३० ताम्रपट व शिलालेख संग्रह करून भारत इतिहास संशोधक मंडळाला दिले, हे सर्व करत असताना त्यांनी काही विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले त्यात अग्रक्रमांक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, श्री गजानन भास्कर मेहेंदळे, श्रीमती शोभना गोखले ह्यांचा आहे ज्यांनी पुढे स्वकर्तुत्व स्वतः चा वेगळा ठसा स्वतः च्या कामातुन दाखवला. […]