नवीन लेखन...

गोंड आदिवासी समाजातील परंपरेचे बळी – कुरमाघर (कथा ४)

वास्तविक निसर्गपूजक माडियागोंड जातीच्या आदिवासीत मातृसत्ताक पद्धत असून  घर चालविण्यात स्त्रीचा मोठा वाट आहे .ती दिवसभर घर व शेतीकामात गढलेली असते,अशा स्त्रीला मासिक पाळीच्या वेळी मात्र कुरमाघरात राहते घर सोडून राहण्यास जावेच लागते. […]

नवं सौरचक्र

सूर्याच्या पृष्ठभागाचं तापमान सुमारे सहा हजार अंश सेल्सियस इतकं असतं, तर सौरडागांचं तापमान हे सुमारे तीन हजार सेल्सियस इतकं असतं. हे सौरडाग जरी सूर्याच्या इतर पृष्ठभागाच्या तुलनेत थंड असले तरी, हे सौरडाग म्हणजे अतितीव्र चुंबकीय क्षेत्राची ठिकाणं आहेत. सूर्यावरून उफाळणाऱ्या सौरज्वाला या, याच डागांच्या परिसरात निर्माण होतात. […]

कुणी तरी येऊन येणार गं

पहिल्या वेळी माहेरी जायची पद्धत आहे. मग सातव्यामहिन्या नंतर ती माहेरी जाते. पण हल्ली थोडा बदल झाला आहे. प्रकृती. तेथील गैरसोय व नोकरी मुळे तिची सोय इथेच केली जाते. मग सासूबाईंना खूपच टेन्शन येत. तरीही त्या पुढील स्वप्नात रमतात. आता पाहुणा की पाहुणी याची उत्सुकता. […]

‘रईस’ भात

स्वयंपाक करणारी स्त्री ही जर का सुगरण असेल तर ती भाताचे विविध प्रकार करुन वाढते. मग तो नारळी पौर्णिमेला केलेला नारळीभात असेल, कधी सणासुदीच्या निमित्ताने केलेला मसाले भात असेल, कधी टोमॅटो भात, कधी विविध भाज्या वापरुन केलेला व्हेज पुलाव असेल, मटारच्या सीझनमध्ये मटार पुलाव असेल तर कधी जिरा राईस! […]

क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे

लहुजींनी महात्मा फुले यांच्या दलित घरात सर्वतोपरी सहकार्य केले. म. फुले यांनी मुलींसाठी शाळा काढली (१८४८). लहुजींनी स्वत:च्या मुक्ता या पुतणीस या शाळेत पाठविले आणि राणबा (हरिजन) च्या मदतीने अनेक मुलींना त्यांच्या शाळेत दाखल केले. मुक्ताने लहुजी आणि फुले दांपत्याच्या प्रभावातून तत्कालीन दलितांच्या दु:स्थितीचे वर्णन करणारा निबंध लिहिला. तो ज्ञानोदय नियतकालिकात प्रसिद्ध झाला (१८५५). तो पुढे ना. वि. जोशीकृत पुणे वर्णन (पुरवणी अंक २) यात छापण्यात आला. […]

ज्येष्ठ तत्वज्ञ जे कृष्णमूर्ती

कृष्णमूर्तींच्या मतानुसार दारिद्र्य, युद्धे, आण्विक संकट आणि इतर दुर्दैवी गोष्टींचे मूळ आपल्या विचारांमध्ये आहे. आपल्या विचारांप्रमाणे आपण जगतो आणि वागतो त्या प्रमाणेच युद्धे आणि सरकारे त्याच विचारांचा परिपाक आहेत. […]

‘भारतीय सशस्त्र क्रांतिचे आद्य जनक’ वासुदेव बळवंत फडके

वासुदेवांनी ब्रिटिश सत्तेला उलथून टाकण्यासाठी सशस्त्र सैन्य उभारण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी काही सहकारी तयार केले. त्यात दौलतराव, गोपाळराव, गणपतराव घोटवडेकर, अप्पा वैद्य, अण्णासाहेब पटवर्धन, परशुराम पाटनकर, भिकाजी पंथ हर्डीकर, माधवराव नामजोशी, सितारामपंत गोडबोले, विष्णु खरे ,बाबु जोशी आदि तरुण होते. […]

बटाट्याच्या चाळीची साठी

या आत्मचरित्रात एकामागून एक प्रसंगांच्या लडी उलगडत जातात. कौटुंबिक कापडखरेदी, सूट शिवणं, मुलांची शालेय प्रगती, सहकुटुंब नाटकाला जाणं, मावशीच्या पार्ल्यातल्या बिऱ्हाडाचा शोध, विडीचा ज्वलंत प्रश्न, खिसा कापला जाणं, ज्योतिष आणि अध्यात्मिक अनुभव, सारं कांही मध्यमवर्गी कारकुनी जीवनाचं सार! […]

एक परीस स्पर्श ( भाग – १५ )

विजयने दुसरा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला. आणि एक प्रेमपत्र लिहायला घेतलं. म्हणजे त्याच्या आयुष्यातील पहिलं आणि शेवटचं प्रेमपत्र लिहायला घेतलं. ते प्रेमपत्र हजार शब्दांचं होतं. त्या पत्राच्या शेवटी त्याने त्याच्या आयुष्यातील पहिली कविताही लिहिली होती. […]

मृत्यु नक्षलवादींचा का गरीब निष्पाप आदिवासींचा ? (कथा ३)

बस्तर व बिजापूर हे छत्तीसगड मधील नक्षल चळवळीचे महत्वाचे जिल्हे, बिजापूर जिल्ह्यातील सारकेकुडा, कोटागुडाव राजपेटा या तीन खेड्यात रात्री गावकीची सभा चालू असताना SRP नी कोणतीही सूचना न देता बेछुट गोळीबार केला, पळापळ झाली, सभा उधळली दुसर दिवशी चंद्रमोळ्या झोपडयां समोर पुरुष व मुलांची प्रेते कापडात गुंडाळलेली, हताश होऊन कपाळाला हात लाऊन बसलेली गावकरी मंडळी त्यात […]

1 10 11 12 13 14 35
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..