ऑस्ट्रेलियन गोलंदाज ग्लेन मॅकग्रा
जन्म.९ फेब्रुवारी १९७० महान ऑस्ट्रेलियन गोलंदाज ग्लेन मॅकग्रा याचा जन्म. पहिल्या आठ कसोटी सामन्यांमध्ये त्याला फारशी छाप पाडता आली नव्हती. पण नंतर त्याच्या कारकीर्दीने भरारी घेतली. वेग कमी करून ऑफस्टंप लाइनच्या किंचित डाव्या किंवा उजव्या बाजूची लाइन ‘पकडून’ मॅकग्रा गोलंदाजी करायचा आणि भल्याभल्या फलंदाजांची भंबेरी उडायची. ताशी १२६ ते १३० किलोमीटर इतका माफक वेगही पुरेसा ठरायचा. […]