सुखदा लाघवी
डोळे भरूनी, मिटूनी पापणी नीत नीत मी! तुजलाच पहावे उघडिता नयन! तूं सहज लपावे दिसता क्षणभर! तूं हळूच हसावे ।। १।। सुखदा लाघवी! हॄदयी फुलावी ब्रह्मकमळ! ते प्रीतीचे उमलावे हितगुज हे! मनामनांचे उमजावे संचिती प्रितिस या घट्ट बिलगावे ।।२।। उमलता फुले! अंतरी गंधाळावे सजता सृष्टी! सप्तरंगा श्रृंगारावे उपभोगुनी! सोहळे ऋतुऋतुन्चे विरघळूनी प्रितीत! आनंदी जगावे ।।३।। प्रीतफुल […]