नवीन लेखन...

शहीद दिन

भारतमातेसाठी बलीदान करणाऱ्या क्रांतीकारकांमध्ये भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांची नावे एकत्रितपणे घेतली जातात. इंग्रज अधिकारी सँडर्स याच्या जाचातून मुक्तता करणाऱ्या या तिघांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. […]

भंगारातली बांगडी – Part 1

इन्स्पेक्टर शामराव साळुंकेनी वागळे इस्टेट पोलीस ठाणे, ठाणे याचा नुकताच चार्ज घेतला होता. पोलीस ठाण्याची, गुन्ह्यांची वगैरे जुजबी माहिती त्यांना मिळाली होतीच परंतु तेवढ्याने साळुकेचं समाधान झालं नव्हतं. सर्वसामान्यपणे ठोकपीट मेथडचा अवलंब करून गुन्ह्याची उकल करण्याकडे त्यांचा कल नव्हता. गुन्ह्याचे सूक्ष्म विश्लेषण करुन, बारीक सारीक धागे जुळवून बुध्दी कौशल्याने त्याची उकल करण्यात त्यांना रस होता. फारच […]

ध्रुवीय प्रकाश – विषुववृत्ताजवळचा

सुमारे ४१,००० वर्षांपूर्वी घडून आलेल्या या पृथ्वीवरील चुंबकीय बदलांत, चुंबकीय ध्रुवांची जागा मोठ्या प्रमाणात सरकली होती. तसंच त्यांच्या तीव्रतेतही मोठा बदल झाला होता. चुंबकत्वातील बदलाच्या घटना अधूनमधून घडून येत असल्या तरी, पृथ्वीच्या चुंबकत्वातला या वेळचा बदल खूपच मोठा असल्यानं लक्षवेधी ठरला आहे. या लक्षवेधी घटनेची झलक त्या काळी विषुववृत्तावरील ‘ध्रुवीय’ प्रकाशाद्वारे दिसून आली असल्याचं, आताचं हे संशोधन दर्शवतं. […]

जाहिरातकार व ललित लेखक सुरेश नावडकर

स्मिता तळवलकर यांच्या ‘तू तिथं मी’ या चित्रपटासाठी स्थिरचित्रण व जाहिरात दोन्ही कामे सुरेश नावडकर यांनी केली. हा चित्रपट सुवर्णमहोत्सवी ठरला. या कामाबद्दल त्यांना दुसऱ्यांदा राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला.  […]

गोमु गुप्तधनाच्या शोधांत (गोमुच्या गोष्टी – भाग १२)

एकदा गोमु माझ्या खोलीवर आला तेव्हां त्याच्या हातांत एक जुनाट गुंडाळी केलेला कागद होता. मी त्याला हे काय आहे म्हणून विचारणार होतो पण त्या आधीच तो म्हणाला, “इंग्रजीत चान्स ‘आॕफ लाईफ टाईम’ म्हणतात ना, तो आलाय माझ्या आयुष्यांत.”
मी त्याच्या तोंडाकडे पहातच राहिलो. […]

राष्ट्रीय दिनदर्शिकेचा केंद्र सरकारने अधिकृतरीत्या स्वीकार केला

राष्ट्रीय दिनदर्शिका ही भौतिकशास्त्रज्ञ डॉ. मेघनाथ साहा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुचविलेली आणि २२ मार्च १९५७ रोजी केंद्र सरकारने अधिकृतरीत्या स्वीकारलेली दिनदर्शिका. ती खगोलशास्त्रावर आधारित असून ऋतुचक्र, भौगोलिक परिस्थिती इ. अनेक घटकांचा सखोल विचार करून तयार करण्यात आली आहे. म्हणूनच तिचा प्रचार व प्रसार होणे गरजेचे आहे. […]

स्वानंद

स्वानंदे मी लिहितो गुणगुणतो आठवांच्या झुल्यावरती झुलतो नुमजे, मज कवितेचे रंगरूप स्वानंदे मी लिहितो गुणगुणतो जाणुनिया साऱ्याच संवेदनांना भावशब्दांतुनी मी व्यक्त करतो अंतरीच्या जाणिवांचेच कंगोरे अलवार भावाक्षरातूनी गुंफितो शब्दधन, भाग्य माझ्या भाळीचे प्राजक्त फुलापरी, नित्य वेचितो शब्द, शब्द सारेच स्वानुभवाचे माझ्या समाधानासाठी लिहितो त्रास नां मला, न इतरां कुणाला मी, माझ्या काव्यसुखात जगतो — वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 […]

जागतिक जल दिन

पाणी हे जीवन आहे, असे जे म्हटले जाते ते किती खरे आहे! परमेश्वर मानवासाठी जी नवीन सृष्टी निर्माण करणार आहे, तिचे एक ओझरते वर्णन पवित्र शास्त्रात आढळते. त्यात लिहिले आहे की, तिच्या मध्यभागातून स्फटिकासारखी निर्मळ अशी नदी असेल आणि तिच्यातून जीवनाचे पाणी वाहत असेल! नाही तर पाण्यासाठीच होईल तिसरे जागतिक महायुद्ध. […]

माध्यमिक शालान्त परीक्षेची सुरुवात

ब्रिटिशांकडून भारताला स्वातंत्र्य मिळाले तरी शिक्षण पद्धती मात्र पूर्वीची ब्रिटिशांचीच होती. स्वतंत्र भारताचा कारभार क्षमतेने चालवायचा तर शिक्षण पद्धती भारतीयच हवी, हा विचार पुढे आला. भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी या कामी पुढाकार घेतला. त्यामुळेच प्रत्येक राज्यात माध्यमिक शिक्षण मंडळे स्थापन झाली. तसेच महाराष्ट्र राज्य शालान्त शिक्षण मंडळ अस्तित्वात आले. या मंडळाने ठरवलेल्या अभ्यासक्रमाप्रमाणे पहिली माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (एस. एस. सी.) १९४९मध्ये आजच्या दिवशी सुरू झाल्या. […]

मौखिक व अमौखिक संवाद

दोन व्यक्तींमधील संवादात सहसा तिसरी व्यक्ती सामील झालेली नसते. हा संवाद व्यक्तिगत, थेट आणि निकटता निर्माण करणारा असतो, ज्यात शब्द, देहबोली यांचा अंतर्भाव असतो. या संवादामुळे व्यक्तीचं मन वळवणे, एखाद्यावर प्रभाव निर्माण करणे शक्य होतं. या संवादामध्ये मौखिक, अमौखिक संवाद शक्य असतो. त्याचबरोबर अशा संवादात तात्काळ प्रतिसादही मिळत जातो. […]

1 10 11 12 13 14 42
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..