नवीन लेखन...

विनोदी लेखक पांडुरंग लक्ष्मण ऊर्फ बाळ गाडगीळ

बाळ गाडगीळ यांनी ६० हून अधिक पुस्तके लिहिली. त्यांच्या ’लोटांगण’ या पहिल्याच विनोदी कथासंग्रहाला पु.ल. देशपांडे यांच्या ‘अपूर्वाई’ या पुस्तकाबरोबर राज्य सरकारचा पुरस्कार विभागून मिळाला होता. ’एकच प्याला, पण कोण?’, ’अखेर पडदा पडला’, ’फिरकी’, ’वशिल्याचा तट्टू’ अशा अनेक पुस्तकांनाही लोकप्रियता मिळाली होती. सिगरेट व वसंतऋतू’ या त्यांच्या प्रवासवर्णनाला राज्य सरकारचे पहिले पारितोषिक मिळाले. […]

जागतिक जंगल दिन

ॲ‍मेझॉनचे जंगल तर वनस्पती आणि प्राण्यांच्या तीस लाख प्रजातींचे आश्रयस्थान आहे. हे जंगल जगातील सर्वात मोठे सदाहरित जंगल आहे. ॲ‍मेझॉनचं जंगल हा नेहमीच जगाच्या आकर्षणाचा विषय राहिला आहे. बाहेरील लोकांसाठी ॲ‍मेझॉनचं गुढ आणि रहस्यानं भरलेलं जंगल नेहमीच खुणावत असतं. […]

सुनील गावसकर यांनी पहिले शतक झळकावले

वेस्ट इंडिजमधील पदार्पणाच्या कसोटी मालिकेत त्यांनी ७७४ धावा काढून मालिका जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. त्यानंतर त्यांची बॅट निवृत्तीपर्यंत तळपत राहिली. १९८३ मध्ये त्यांनी डोनाल्ड ब्रॅडमन यांचा सर्वाधिक कसोटी शतकांचा (२९ शतके) हा विक्रम मोडला. […]

हौस – Part 2

घरी आल्यावर बायकोने कपाळावर हात मारला! “अहो, या दोन किलो जिलब्या मी काय माझ्या डोक्यावर थापून घेऊ का? जा, जा, परत करा त्या मी दोनशे ग्रॅम सांगितल्या तर दोन किलो घेऊन आलात? खाणारे आपण तिघं त्यात मला डायबेटीस. तुम्ही एखादा तुकडा खाणार, मग याचं काय करायचं?’ “अग, असू दे आता. मी मुद्दामच आणल्यात जास्त. तुला हव्या […]

जागतिक बालरंगभूमी दिवस

बालरंगभूमी हा उत्तम अभिनेता किंवा अभिनेत्री घडविण्याचा पाया आहे. हा पाया लहान वयातच पक्का करून घेतला तर पुढे व्यावसायिक रंगभूमी, चित्रपट किंवा दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांसाठी कसदार अभिनय करणारे चांगले कलाकार मिळू शकतात. नाटक, चित्रपट किंवा दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमध्ये आघाडीवर असलेल्या अनेक कलाकारांची सुरुवात बालरंगभूमीपासूनच झाली आहे. […]

भिंतीच्या पलिकडे (संक्षिप्त रूपांतरीत कथा ४)

मी अनेक वर्षांनी पुन्हा डेहराडूनला जाणार होतो. पाश्चात्य देशांत जाऊन मी नशीब काढलं होतं आणि मी डेहराडूनमधील मित्रांना विशेषतः माझा शाळासोबती मोहन इनामदारला भेटायला उत्सुक होतो. मी डेहराडून सोडल्यावरही अनेक वर्षे त्याचा आणि माझा पत्रव्यवहार चालू होता. सर्व पत्रव्यवहारांमध्ये होतं तेच आमच्या बाबतीत झालं. पत्रव्यवहार प्रथम कमी कमी झाला आणि मग तो कधी बंद पडला ते माझ्या लक्षांतच आलं नाही. […]

बालनाट्याची पुढील दोन दशके(२००० ते २०२०) (बालरंगभूमी माझ्या नजरेतून – भाग४)

रत्नाकर मतकरी यांच्या पुढाकाराने ठाण्यातील कामगार वर्गातील मुलांसाठी वंचित बाल नाट्य रंगभूमी सुरू करण्यात आली.बालनाट्य चळवळ तळागाळातील मुलापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी ठाण्यातील काही निष्ठावंत रंगकर्मींनी बजावली. […]

मौखिक आरोग्य दिवस

जेष्ठांपासून युवा वर्गापर्यंत मौखिक आरोग्य स्वच्छतेची काळजी आणि त्याच्या फायद्यांसंबंधी जागरूकता वाढवणे हाच या आंतरराष्ट्रीय दिवसाचा उद्देश आहे. […]

ठाणे जिल्ह्यातील पत्रकारिता

ठाणे जिल्ह्याची पत्रकारिता ही तब्बल दिडशे वर्षांची जुनी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील ठाणे जिल्ह्याचे पहिले ज्ञात मराठी साप्ताहिक म्हणून ‘अरुणोदय’ वृत्तपत्राचा उल्लेख करावा लागेल. स्वातंत्र्य मिळण्याच्या ८१ वर्ष आधी आणि मुंबईत मराठी वृत्तपत्रांची सुरुवात झाल्यानंतर जवळपास ३४ वर्षांनी ठाणे शहरात पहिले वृत्तपत्र सुरू झाले. काशिनाथ विष्णू फडके यांनी हे पत्र सुरू केले. २२ जुलै १८६६ रोजी पहिला अंक प्रसिद्ध झाला. […]

देही स्पर्श मयुरी

गंगाभागिरथी, किनारी ओलेती सांजाळ केशरी अस्ताचली बिंब लालगे गंगाजळी, चैतन्य लहरी उजळलेली तिन्हीसांजा मंद, मंद तेवते गाभारी तनमनअंतर प्रसन्न सारे गंगौघाच्या शांत किनारी. आसक्त! अधीर यामिनी गहिवरलेले प्रीतभाव उरी शीतल,झुळझुळ लाघवी मनगंगेच्या, या लाटावरी. गगनी,घननीळ सावळा देही, सारेच स्पर्श मयुरी वेद! मनी, आलिंगनाचे पुण्यप्रदी,गंगेच्या किनारी ब्रह्मस्वरूपी, राधा, मीरा लोचनी, तो श्रीरंगमुरारी द्वैत,अद्वैताचे रूप मनोहर घुमते मंजुळ […]

1 13 14 15 16 17 42
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..