नवीन लेखन...

जागतिक निद्रा दिन

शांत झोप झाल्याने मेंदू ताजा-तवाना राहतो. नियमित कामात मन चांगले लागते. कामावर लक्ष्य केंद्रीत होते. कामं चांगले होतात. म्हणून झोपेची काळजी घेणे आवश्यक आहे. झोप चांगली लागावी म्हणून काही व्यायाम, औषधे सुचवली जातात. झोपेमुळे शरीराचे कार्य चांगल्या पद्धतीने होण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ६ ते ९ तास झोपणे आवश्यक असल्याचे अनेक मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर सांगतात. स्लीप हायजिन’ पाळणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. […]

मेल्टिंग पॉट की सॅलड बाउल ?

….. एकेकाळी यालाच आपण “एकत्र कुटुंबपद्धती ” म्हणत होतो आणि हळूहळू त्या पॉटमधील नातं वितळत गेल्यामुळे (अजूनही माझ्या बघण्यात काही सन्माननीय अपवाद आहेत) आता ती “विभक्त कुटुंब पद्धती” झालीय आणि अविभाज्यपणे जीवनपद्धती म्हणून स्वीकारली गेली आहे. सगळी छोटीछोटी घरे म्हणजे सॅलड बाउल्स ! […]

विचारांना वाट करून देण्याची गरज

मनांत येणाऱ्या अनेक विचारांना वाट करून देण्याची गरज असते, त्यांना मोकळं करण्याची जरुरी असते. बोलून दाखवलेल्या मनांतील विचारांमुळे मनावरचा ताण हलका होतो. आपल्या मेंदूत साठवलेले, आठवलेले अनेक विचार, विषय ड्रेन करण्याची आवश्यकता असते. […]

बुटिक कंपनीच्या सर्वे सर्वा माया परांजपे

सत्तरचे दशकभर त्यांनी सौंदर्य प्रसाधन, केशभूषा या विषयांतील विविध शास्त्रीय अभ्यासक्रम पूर्ण केले आणि १९७७ मध्ये त्यांना ‘ब्रिटिश असोसिएशन ऑफ ब्यूटी थेरपी अँड कॉस्मेटोलॉजी’चे सदस्यत्व मिळाले. हे पद मिळवणाऱ्या त्या दुसऱ्या भारतीय! त्यानंतरही त्या या क्षेत्रातील बदलती तंत्रे आत्मसात करत होत्या. मग ते केशभूषा तंत्र असो, अरोमाथेरपी असो वा हॉट स्टोन थेरपीसारखी अद्ययावत गुंतागुंतीची तंत्रे; ती जिथे उत्तमपणे शिकविली जात, अशा संस्थांतून त्यांचे शिकणे चालूच होते. […]

दूरदर्शनी बातम्या

दूरदर्शन सुरु झाल्यावर आम्ही ‘अपट्राॅन’ कंपनीचा कृष्णधवल पोर्टेबल टीव्ही घरी आणला होता. त्याकाळी संध्याकाळच्या बातम्या आवर्जून बघितल्या जात असत. तेव्हा वासंती वर्तक हमखास दिसायच्या.. टिपिकल साडी आणि नाममात्र मेकअपमुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व खुलून दिसायचं. त्याआधी मित्रांच्या घरी जाऊन टीव्ही बघताना, भक्ती बर्वे, स्मिता तळवलकर यांना बातम्या देताना अनेकदा पाहिलेलं होतं. […]

‘बेगमबर्वे’ या नाटकाचा पहिला प्रयोग

बेगम बर्वे (१९७९) हे अनेकार्थांनी मराठी रंगभूमीच्या इतिहासातील एकमेवाद्वितीय नाटक आहे. सामान्यतः एकत्र वा विभक्त कुटुंबातील व्यक्तींचे परस्परसंबंध व त्यातून उत्पन्न होणारे ताणतणाव मराठीतील अनेक नाटकांच्या केंद्रस्थानी असतात. या नाटकात योजून चार व्यक्तिरेखा आहेत. त्यांचे एकमेकांशी रक्ताचे नाते नाही. अनाम पण दृढ भावबंधांनी या व्यक्ती परस्परांशी जोडल्या गेल्या आहेत असेही दिसत नाही. नाटकात रूढ अर्थाने नायक-नायिका नाहीत. चौघांपैकी जावडेकर, बावडेकर व शामराव हे तिघेजण मध्यमवयीन पुरुष आहेत. बर्वे बाह्यत: पुरुष आहे परंतु अंतर्यामी तो स्त्रीचे जीवन जगतो. […]

आधुनिक भास्कराचार्य विनायक लक्ष्मण ऊर्फ केरुनाना छत्रे

गहन विषयांच्या व्यासंगात गढलेल्या केरुनानांना शास्त्रीय संगीत, संगीत नाटके व स्वत: पियानो वाजवण्याची आवड होती. शिवाय किर्लोस्कर नाटक मंडळीत त्यांचा राबता होता. फार काय नाटकांच्या तालमींना हजर राहून ते मोरोबा वाघोलीकर आणि बाळकोबा नाटेकर या गायक नटांना गाण्याच्या अतिरेकानं नाटकाचा रसभंग होतो, असा सल्ला देत असत. त्यांच्या या गुणांवर लुब्ध होऊन अण्णासाहेब किर्लोस्करांनी आपले ‘सौभद्र’ हे नाटक त्यांना अर्पण केलेलं आहे. […]

ज्येष्ठ कवी, गीतकार डॉ. मुरलीधर गोडे

टीव्ही आणि आकाशवाणीसाठी त्यांनी तब्बल पन्नासच्यावर सुंदर जिंगल्स लिहिल्या. १९७७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘बन्या बापू’ या मराठी चित्रपटाची सर्व गीते प्रचंड गाजली. ‘प्रीतीचं झुळझुळ पाणी’, ‘मी कशाला आरशात पाहू गं…’, ‘अरे ले लो भाई चिवडा लेलो’, ‘हे गर्द निळे मेघ, बिलगून जशी वीज’ ही चार गाणी उषा मंगेशकर, शैलेंद्र सिंग, अनुराधा पौडवाल यांनी गायलेली, तर संगीत दिले होते ऋषी-राज या संगीतकाराने. […]

स्विस अभिनेत्री उर्सुला एंड्रेस

उर्सुला एंड्रेस यांनी पहील्या जेम्स बॉन्ड चित्रपट डॉ नो मध्ये काम केले होते. त्यांचे द सदर्न स्टार, फन इन अकापुल्को , शी , द 10 विक्टिम , द ब्लू मैक्स , परफेक्ट फ्राइडे , द सेंसफुल नर्स , द माउंटेन ऑफ कैनिबल गॉड , द फिफ्थ मस्कटियर, द फाइट ऑफ टाइटन, क्लैश ऑफ द टाइटन्स हे इतर चित्रपट आहेत. […]

यशाचा मार्ग (कथा)

अनघा प्रकाशन आयोजित कथास्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त कथा. लेखक श्री. रवींद्र वाळिंबे अनघा दिवाळी अंक २०२० मध्ये श्री. रवींद्र वाळिंबे यांनी लिहिलेली ही कथा.  सौरभ शाळेतून घरी आला तोचमुळी आनंदात आणि का येऊ नये? गायन स्पर्धेत पहिला आला होता तो. सौरभ गिरकी घेत घरात शिरला. शाळेचे दप्तर कोचावर धाडकन फेकले. अंगातला युनिफॉर्म तसाच भिरकावला आणि तो […]

1 16 17 18 19 20 42
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..