वैज्ञानिक वानर (संक्षिप्त रूपांतरीत कथा ३)
स्टीव्हनसनचे वाङ्मय खूप प्रसिध्द आहे. डाॅक्टर जेकील आणि हाईड ही त्याची दीर्घकथा सर्व वाचकांच्या व सिनेरसिकांच्या परिचयाची आहे. अवघ्या ४४ वर्षांच्या (आतापर्यंतचे तीनही लेखक ॲास्कर वाईल्ड ४६, अँटन चेकॉव्ह ४४ आणि स्टीव्हनसन ४४ अल्पवयीच म्हणायचे) आंतच चौदा कादंबऱ्या आणि सहा कथासंग्रह लिहिले.
त्याने अरेबियन नाईटस् या नांवाखाली युरोपबद्दल सुरस कथा लिहिल्या. ट्रेझर आयलँड ही त्याची कादंबरीही प्रसिध्द आहे. […]