नवीन लेखन...

संवाद.. की द्विवाद..?

तर आजचा आपला विषय आहे, ‘मुलांचं एकमेकांसोबत खेळणं’. मुलांचं मानसशास्त्र सांगतं की, मुलांची सामाजिक जाणीव एक ते तीन वर्षांच्या दरम्यान सुरू होते. प्रत्येक मुलाची ही समज, आणि जाणिवेची पातळी वेगवेगळी असते, आणि तशीच ती identical जुळ्यांचीसुद्धा असते. […]

हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत कारभारी दादोजी कोंडदेव

दादोजींनी देशमुखीतील तंटे मोडून त्यांना स्वराज्याच्या कामगिरीत एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. अनेक भांडणांचे निवाडे केले. दादोजी एक लहानसाच ब्राह्मण पण त्याने केलेले निवाडे औरंगजेबासही मान्य झाले, असे पहिल्या शाहूने त्याच्याविषयी उद्गार काढले आहेत. […]

नॅशनल पोटॅटो चिप्स डे

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेने या बटाटा चिप्सवर ‘अनावश्यक खाद्यपदार्थ’ (non essential food) म्हणून बंदी घातली होती. अर्थात या चिप्सच्या उत्पादकांनी ही बंदी मोडून काढली. म्हणून १४ मार्च हा अमेरिकेत नॅशनल पोटॅटो चिप्स डे म्हणून साजरा केला जातो. बटाटा चिप्स हा अमेरिकन मंडळींचा नंबर वन स्नॅक्स आहे. भारतातली परिस्थिती काही वेगळी नाही. उपवासाचे दिवस आणि काही पदार्थ […]

कितीक तुझ्यात गुंतून गेले

कितीक तुझ्यात गुंतून गेले भावुक वेल्हाळ मी झाले, अशी कशी अवखळ झाले अलगद भान हरपून बसले काहूर उठता अंतर मनी प्रश्न पडतील वेगवेगळी, तू कितीक दूर दूर जाशी तितकी जखम खोल हृदयी रानावनात रान गाणी रमते अल्लड मग फुलराणी, निःशब्द भाव साऱ्या आठवणी न विसरली तुला अबोल अबोली मदमस्त वारा बेफाट होई तुझी आठवण कातर क्षणी, […]

सोड अबोला

नकोस बोलू, मीही सारे जाणतो न उरले, काहीच बोलण्यासारखे जाणतो मी, तुझ्या मौनी वेदनांना आज नां काहीच विसरण्यासारखे जे जे अव्यक्त! कसे व्यक्त करावे सांगनां! तूं काय सावरण्यासारखे जे, जे घडले, ते, ते हृदयस्थ सारे सत्य! कोणते व्यक्त करण्यासारखे तूच सांगनां, काय कसे घडले होते जगी जगलो साऱ्यांच्या मनासारखे आज हा असा विरही दुरावा भाळी यावीण […]

‘द गॉडफादर’ चित्रपटाची ५० वर्षे

द गॉडफादर ही कादंबरी लिहिलेल्या पुझोचा साहित्यिक प्रवास पुढे सुरु राहिला असला तरी त्याला गॉडफादरने जितकी प्रसिध्दी मिळवून दिली तशी ती त्याच्या अन्य कुठल्या साहित्यकृतीने दिली नाही. गॉडफादरच्या तिन्ही भागांना वेगवेगळ्या क्षेत्रात ऑस्कर मिळाले आहेत. […]

यामिनी (एक संक्षिप्त कथा)

एके दिवशी सुरम्य संध्याकाळी, सर्वाथानेच मुग्ध गंधाळणाऱ्या अप्रतीम सुंदर अशा कार्यक्रमात निमंत्रीतांच्याच रांगेत मी बसलो होतो. माझ्याच पुढील रांगेत अगदी माझ्याच समोरील खुर्चीत एक विलक्षण स्वर्ग सुंदरी बसली होती. तिच्या त्या लावण्य सुंदर कमनीय पाठमोऱ्या पण अप्रतीम सौन्दर्याने तीला पाहण्याची तीव्र इच्छया मला झाली होती. खरं तर असं कधीच झालं नव्हतं! तिच्या त्या सुकुमार गौरांगी सोज्वळ […]

कृष्णा व सुदामा

आज दादांचा २४वा स्मृतिदिन! त्यानिमित्ताने आज तीन स्त्रियांना पुरस्कार दिला जाणार आहे. त्यातील पहिली आहे, सौ. सुप्रिया शेखर शिंदे! हिने शिल्पकलेत प्रावीण्य मिळवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ शिल्प घडवण्यात भारतातील पहिल्या स्त्री शिल्पकाराचा मान मिळवला. […]

‘आलम आरा’ पहिला भारतीय बोलपट

१४ मार्च १९३१ रोजी ‘आलम आरा’ मुंबईच्या ‘मॅजेस्टिक’ सिनेमात लागला होता. पहिल्या दिवशी, पहिल्या शोच्या तिकीटासाठी सिनेमा हॉल बाहेर मोठी गर्दी जमली होती. या प्रकरणाला सांभाळण्यासाठी पोलिसांनासुध्दा बोलवावे लागले होते. जे तिकीट चार आण्यात मिळत होते, त्याला लोकांनी ब्लॅकमध्ये पाच रुपयांत खरेदी केले. सांगितले जाते, ब्लॅक मार्केटिंग भारतीय सिनेमाच्या पहिल्या बोलपटापासून सुरु झाली. […]

ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. अरुण निगवेकर

नॅकचे जनक अशी ओळख असलेले डॉ.निगवेकर यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची जबाबदारी २०००-२००५ या कालावधीत सांभाळली. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पंधरावे कुलगुरू म्हणून त्यांनी १९९८ ते २००० काम पाहिले. […]

1 24 25 26 27 28 42
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..