कृष्णछाया
मी जगतोच, तसा एकांती आभाळ मनाचे येते भरुनी झरती निष्पाप भाव अंतरी अतरंग भक्तीत जाते दंगुनी अस्ताचली, भावरंग केशरी त्यावरी कृष्णछाया सांत्वनी जणु भासते समोर सावळा कृतार्थी तृप्तता या लोचनी झुळझुळते माय गंगायमुना पावन तुषारी जातो भिजूनी एकांती प्रहर सारे आत्मरंगी कृपावंता स्मरत राहू जीवनी — वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र. ८४. १७ – ३ – २०२२.