नवीन लेखन...

गीतात सुगंधा

मनांतरीच्या भावनांना शब्दातुनी मी माळीतो अंतरातील गुज प्रीतीचे भावगीतात मी मांडितो स्पर्श! वात्सल्यप्रीतीचे स्वरगंगेसवे, गुणगुणतो गुणगुण आर्त भावनांची मी हृदयांतरी आळवितो गीता! ही प्रीतभावनांची श्वासासंगे, मी गुणगुणतो गीतात! नि:ष्पाप सुगंधा गंधाळ! जीवनी दरवळतो दिव्य! सुरम्य भावस्पर्ष प्रीतशब्दातूनी,ओघळतो लोचनी, तीच एक प्रीती मी, मलाच भुलूनी जातो कृपा ही त्याच दयघनाची मी तिला मनांतरी स्मरतो सदैव, हीच ओढ […]

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव शिंदे

राजमाता विजयाराजे शिंदे यांचे चिरंजीव माधवराव शिंदे यांनी राजकारणात प्रवेश करत १९७१ मध्ये गुना लोकसभा मतदारंसघातून निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर १९८४ पर्यंत ते गुनातून खासदार म्हणून निवडून आले. […]

रशियन-अमेरिकन लेखिका आणि तत्त्वज्ञ आयन रँड

आयन रँड यांची सर्वात जास्त गाजलेली ‘ॲ‍टलास श्रग्ड’ ही कादंबरी १९५७ मध्ये प्रकाशित झाली. ॲ‍टलास हे स्वतःच्या खांद्यावर पृथ्वी तोलून धरणारे ग्राीक पुराणकथेतील पात्र. या कादंबरीत जग तोलून धरणाऱ्या आदर्शवत मानवांची अशीच कल्पना केली आहे. त्यांनी एखाद्या क्षणी जर ही जबाबदारी नाकारली आणि खांद्यावरील ओझे झटकले तर काय.. मात्र हे आदर्श पूर्णपणे वस्तुनिष्ठतावादाला धरून आहेत. हे काही पारंपरिक नैतिक कसोटीवरचे सामाजिक धार्मिक आदर्श नव्हेत! स्वार्थ, आत्मकेंद्रित असणे म्हणजे पाप नाही हे यात ठासून सांगितले आहे. […]

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईचा वर्धापन दिन

आय आय टी पवई ही संस्था तंत्रज्ञान शिक्षण आणि संशोधन ह्या बाबतीत जगामध्ये पथदर्शी म्हणून ओळखली जाते. येथून उत्तीर्ण होऊन बाहेर पडणाऱ्या अत्यंत प्रतिभाशाली पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांमुळे ह्या संस्थेकडे देशातील उत्तम विध्यार्थी आकर्षित होतात. संस्थेतील संशोधन व क्रमिक अभ्यासक्रम हा दर्जेदार प्राध्यापकांकडून केला जातो. ह्या पैकी बरेच प्राध्यापक हे जागतिक स्तरावर नावाजलेले आहेत. […]

पहिली स्त्री दिग्दर्शिका फातमा बेगम

फ्रान्सचा जॉर्ज मेलिएस हा फन्टासी चित्रपटाचा जनक मानला जातो. याच धर्तीवर फातिमा बेगम यांना भारतीय फन्टासी चित्रपटाचे श्रेय देण्यात यायला काहीच हरकत नाही. निर्माती, अभिनेत्री व दिग्दर्शक म्हणून “बुलबुल-ए-परीस्तान” “हिर रांझा”, “नसीब की देवी”, “चंद्रावली”, “कनकतारा”, “शंकुतला” “मिलन” आणि “गॉडेस ऑफ लक” हे सर्वच मूकपट त्याकाळी खूप गाजले. खरे तर १९२० चे दशक स्त्रियाच नाही तर पुरुषांनीही चित्रपटात काम करणे यानां मान्यता देणारे नव्हते त्यामुळे अशा पार्श्वभूमिवर फातमा बेगम सारखी सनातनी मुस्लिम कुटूंबातील स्त्री येथे येऊन निर्माती, लेखक, दिग्दर्शक व अभिनेत्री म्हणून आपले स्थान निर्माण करते ही खरोखरच कौतुकांची व विचार करण्यासारखी बाब आहे. आज चित्रपटसृष्टीतील स्त्रियांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्याच्या मागे जे प्रेरणास्त्रोत असतात ते फातमा बेगम सारख्या जिद्दी स्त्रीचे. १९३८ चा “दुनिया क्या कहेगी” हा त्यांचा शेवटचा चित्रपट. […]

कवी प्रा. अशोक बागवे

आलम, आज इसवीसन, गर्द निळा गगनझुला, मंदीला हे काव्यसंग्रह, असायलम, आमचे येथे श्रीकृपेकरुन, राधी यांसारखी राज्यनाट्यस्पर्धा पारितोषिक विजेती नाटकं; मृतिकाघट, अश्वत्थामा, माचिस यांसारख्या एकांकिका असं विपुल लेखन त्यांनी आजवर केलं आहे. तसंच सुमारे ५० चित्रपटांसाठी बागवे यांनी गीतलेखन केलं आहे. […]

हसताना पडते तिला गोड खळी

१९९० च्या जून महिन्यातील मुंबईची सकाळ.. आमचं ‘सूडचक्र’ चित्रपटाचं सर्व युनिट ‘किरण’ बंगल्यावर पोहोचलं. दहा वाजता मुहूर्ताचा नारळ वाढवून, शुटींगला प्रारंभ झाला.. लेडी इन्स्पेक्टरच्या गेटअपमध्ये ती कॅमेऱ्यासमोर आली आणि मी पहातच राहिलो.. ती होती चित्रपटाची डॅशिंग नायिका, वर्षा उसगांवकर!! तिला पहिल्यांदा पुण्यात मी पाहिलं होतं, ‘तुझ्या वाचून करमेना’च्या सेटवर.. त्यावेळचं चित्रपटसृष्टीतील तिचं, ते पदार्पण होतं.. ‘सुयोग’च्या […]

जागतिक किडनी दिवस

किडनीचं महत्त्वाचं काम आहे, शरीरातील टॉक्सिन्स पदार्थ बाहेर टाकणं. जेव्हा किडनीच्या या कामामध्ये अडथळे निर्माण होतात त्यावेळी किडमध्ये टॉक्सिन्स मोठ्या प्रमाणावर जमा होतात. त्यामुळे हातापायांवर आणि चेहऱ्यावर सूज येते. […]

अमेरिकन मार्शल आर्ट अभिनेता चक नॉरीस

‘वे ऑफ द ड्रैगन’ मध्ये चक नॉरीस यांनी ब्रूस ली यांच्या बरोबर काम केले होते. ‘कोड ऑफ साइलेंस’, ‘द डेल्टा फोर्स’ व ‘फायरवॉकर’ हे त्यांचे इतर गाजलेले चित्रपट. […]

मराठी अर्वाचीन कादंबरीचे जनक हरी नारायण उर्फ ह.ना.आपटे

ह. ना. आपटेंनी अनेक पुस्तकांना प्रस्तावनाही लिहिल्या. ह. ना. आपटेंनी साहित्याच्या अनेक प्रांतांत मुशाफिरी केली असली, तरी ते गाजले त्यांच्या कादंबरी लेखनामुळेच. बारा सामाजिक व अकरा ऐतिहासिक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्या सर्वच लोकप्रियही झाल्या. पण त्यांचे नाव आजतागायत गाजत राहिले, ते त्यांच्या ‘पण लक्षात कोण घेते?’ या कादंबरीमुळे. ही कादंबरी मराठी साहित्याच्या वाटचालीतील मैलाचा दगड बनून राहिली. […]

1 29 30 31 32 33 42
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..