रेशीमगाठी – भाग २
“अग, ही मुंबई आहे. नगर नाही. इथली गर्दी आणि त्यातही ती ऑफिस टाइमच्या लोकलची. अग, नुसती गर्दी पाहूनच रोज जाणाराही हबकतो तर हिची काय कथा? इंटरव्हूला जाईपर्यंतच चिपाड होईल तिचं!” […]
“अग, ही मुंबई आहे. नगर नाही. इथली गर्दी आणि त्यातही ती ऑफिस टाइमच्या लोकलची. अग, नुसती गर्दी पाहूनच रोज जाणाराही हबकतो तर हिची काय कथा? इंटरव्हूला जाईपर्यंतच चिपाड होईल तिचं!” […]
आदिवासी तरुण मुली व बाया बांबूच्या आकर्षक वस्तू बनिविण्याचे १५ दिवस शिक्षण घेऊन परत आपआपल्या खेड्यात व्यवसाय चालू करणार होत्या. ते सर्व विकण्याची जबाबदारी खाजगी कंपनी घेणार होती. बाई प्रांज्वळपणे सुरेख हिंदीत सर्व माहिती देत होत्या. प्रशिक्षण देणाऱ्या बाईंना मुंबई बद्दल कुतहूल होते.त्यात आम्ही विमानाने आलो, म्हणजे आकाशातून कसे आलो ह्या बद्दल त्या निरागसपणे प्रश्न विचारत होत्या. […]
माणसाच्या जीवनात स्त्रीचा सहवास सुरु होतो, तो आईपासून. त्यानंतर मावशी, आत्या, काकू, आजी, पणजी, भाची, पुतणी, मुलगी, सून, नात या नात्यांची भर पडत जाते. जीवनातील प्रत्येक वळणावर स्त्री कोणत्या ना कोणत्या भूमिकेतून त्याला आयुष्यभर भेटतच रहाते. काहीजणी, काही क्षणांसाठी भेटतात तर काही शेवटपर्यंत साथ देतात. मात्र प्रत्येकीची नोंद ही त्यांच्या मनाच्या ‘हार्ड डिस्क’मध्ये झालेली असते. जी […]
सर्वांची उधार देण्याची मर्यादा संपली की गोमु एखादी तात्पुरती नोकरी शोधी. पैसे हातात आले की बरीचशी उधारी फेडून टाकी आणि परत उधार घ्यायला मोकळा होई. उधारी करणे हे आपण मराठी माणसे कमीपणाच कां मानतो कुणास ठाऊक! तसं तर म्हणतात की मानव अथवा त्याचा आत्मा हे शरीर निसर्गाकडून उधारच घेतो आणि जातांना परत निसर्गांतच सोडून जातो. […]
घालून पोतडीत काळ उगा धावतो आहे किती राहिली किती गेली याचा हिशेब मांडतो आहे एक सोनेरी आशा उद्या म्हणून वेडा जीव सुखावतो आहे उद्या कधीही येत नसतो आज हाच रोज उगवतो आहे एकेक क्षण प्रत्येकाच्या सुखदुःखाचा सोबतीनं वाहतो आहे हो प्रवाही सरितेसारखा डबक्यात बेडके चिकार आहेत एकेक दिस असा जगून घे जसा आज हाच अंत आहे […]
खळाळत्या पाण्यात सूर प्रवाही आहे केशर पहाट वेळी प्राजक्त दरवळून आहे मिटल्या नयनात स्वप्न अलगद मिटून आहे सोन सकाळी किरणांचे सडे अंगणी रेघून आहे मूक ओठांत शब्दांचे चांदणे मधुर आहे लाजणाऱ्या गालावरी मंद स्मित पसरुन आहे भिजल्या गात्र देही रोमांच शहारुन आहे डोक्यावर पदर बाईचा नयनात स्निग्ध भाव आहे देहाच्या बाहेर मन पिसारा मोहरुन आहे मी […]
डांबले उरी, मी दुःखवेदनांना आज विकल अव्यक्त भावनां संवेदनांचे सारे स्पर्श वेगवेगळे दाह अंतरी सोसू कसा सांगना विधिलिखित! जरी हे ललाटी भोगूनी संपणार कां? सांगना सत्कर्मी! चालतोही मी विवेके तरी अस्वस्थ मन हे कां सांगना क्षण! तू तर सारेसारे जाणतेस तरीही तू कां? अबोल सांगना मीच शोधितो, स्वतःला अंतरी जीवन! कधी उमगणार सांगना जीव! हा व्याकुळ […]
कृतज्ञता ही कदाचित एकमेव अशी भावना असेल जिचा प्रत्येकाला केव्हा ना केव्हा अनुभव येतोच पण ती अभावानेच व्यक्त होते. एकतर आपण इतरांना गृहीत धरत असतो आणि त्यात काय मोठं? ते त्या व्यक्तीचं कामच आहे. त्यासाठी त्याला पगार मिळतो, मग वेगळं कौतुक /कृतज्ञता यांची गरज काय? किंवा आपण बर्याच गोष्टींवर आपला हक्क मानत असतो. अशावेळी या ना त्या कारणाने कृतज्ञता राहूनच जाते. […]
गोपाळ देऊसकर यांनी बालगंधर्व रंगमंदिरासाठी, बालगंधर्वांची दोन रूपातील केलेली पूर्णाकृती चित्रे सुप्रसिद्ध आहेत. ही चित्रे करण्यासाठी माॅडेल म्हणून ज्येष्ठ मराठी चित्रपट अभिनेते, विवेक यांची निवड केली होती. स्त्री रुपातील रुक्मिणीचा हात चितारताना मऊसुत, गुलाबी रंगाचा पंजा असणारी स्त्री, गोपाळ देऊसकरांना हवी होती. हृदयनाथ मंगेशकरच्या लग्न समारंभात, कॅमल कंपनीच्या मालकांची पत्नी, रजनी दांडेकर हिचा हात पाहिल्यावर गोपाळ देऊसकरांना चित्रासाठी तो योग्य वाटला. ही रजनी, पूर्वाश्रमीची संगीत रंगभूमीचे गायक नट, अनंत वर्तक यांची कन्या होती. तिचा हात पाहून त्यांनी तो हुबेहूब चितारला व चित्राला जिवंतपणा आला. […]
व्हॅन शिप्ले एक महान वादक व संगीतकार होते. त्यांनी १५०० हून अधिक चित्रपटां मध्ये गाणी वाजवली होती. ५० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा बरसात चित्रपटाच्या यशाने त्यांचे नाव एचएमव्ही या रेकॉर्डिंग कंपनीच्या चित्रपटातील गाण्यांच्या इंस्ट्रुमेंटल आवृत्त्यांचे रेकॉर्डिंग करणारे ते पहिले होते. एचएमव्हीने त्यांना वैयक्तिक वादक म्हणून साइन केले. त्यांचे पहिला रेकॉर्ड गिटारवर सादर केलेला तुम भी भूल दो (जुगनू)चे गाणे होते. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions