कंगोरा घाटी राष्ट्रीय उद्यान (उगवता छत्तीसगड – Part 5)
जंगलातील एक रस्ता कोटमसार गुहे कडे जातो. या गुहा हे एक नैसर्गिक गूढ आहे. १९०० सालात ह्या गूढ गुहेचा प्रथम शोध लागल्याची नोंद आहे. ह्या गुहेच्या अंतर्भागातील माहितीची नोंद कुठेही नसल्याने ही गुहा अज्ञानातच राहिली. १९५१ साली निसर्ग संशोधक डॉ.शंकर तिवारी यांनी ह्या गूढ गुहेच्या खाली उतरून त्याचा सखोल अभ्यास केला. ही गुहा जमिनीखाली ३०० मीटर असून तळाला रुंदी २० ते ७२ मीटर इतकी विशाल आहे. […]