आदर्शाचार्य
“अहो त्या वाह्यात गुरुजींना आदर्शाचार्य पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाला प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात. त्याला पंधरा दिवस होऊन गेले आता. त्यातला ताजेपणाही निघून गेला. तरीही त्यांची मुलाखत तुम्ही अजूनही घेतली नाहीत? कुठे होता तुम्ही सूर्याजी रविसांडे?” ‘रोजची पहाट’ चे संपादक आणि विशेषांक सम्राट आपल्या प्रमुख वार्ताहरवर म्हणजे काका सरधोपट यांच्यावर फारच नाराज झाले होते. […]