मालिका मल्लिका (कथा)
दैनिक ‘रोजची पहाट’चे संपादक सूर्याजीराव रविसांडे अत्यंत अस्वस्थ होते. त्यांचे प्रमुख वार्ताहर काका सरधोपट दिवाळीची सुट्टी घेऊन जे गायब झाले होते ते अजूनही उगवलेले नव्हते. रोजची पहाट होत होती, पण काका नसल्यामुळे दूरदर्शन मालिकांवर विशेषांक काढायचे काम रखडलेल होते. प्रसिद्ध ‘दूरदर्शन मालिका’ लेखिका ज्यांना ‘मालिका मल्लिका’ म्हणत त्या कादंबरीबाई गुंडाळे यांची मुलाखत घ्यायचे काम काकांना दिले होते. पण ‘भरवशाच्या म्हशीला टोणगा’ तसे हे भरवशाचे काका, सूर्याजीरावांच्या काळजाचा ठोका चुकवित होते. त्यामुळेच ते बेचैन होते, तेवढ्यात काका आले. […]