माझी स्वतःची खरी भूतकथा (संक्षिप्त रूपांतरीत कथा ६)
यथावकाश मला माझं भुत किंवा भुतं भेटली. आतापर्यंत मी लेखक बेसंट यांना पाठींबा देत होतो पण आता विरोध करतो. आपण त्या बंगल्याला ‘खटमल’ बंगला म्हणू. ज्याची कातडी नरम आहे त्याला डाक बंगल्यात रहायचा अधिकार नाही. त्याने लग्न करावं. तो बंगला जुना, घाणेरडा, दुरूस्ती न केलेला होता. भिंती खराब होत्या, खिडक्या काळ्या पडलेल्या होत्या. तिथे आसपास बरेच कचेरीतले मामुली अधिकारी, अर्थखात्यापासून ते जंगल खात्यापर्यंतचे, रहात पण कुणी गोरा साहेब नव्हता. वयाच्या दुप्पट वांकलेल्या खानसाम्याने हे मला सांगितलं. जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा वारा आणि पाऊस होता आणि बाहेरच्या पामच्या झाडांचा हाडे आपटावीत तसा आवाज येत होता. माझं आगमन खानसाम्याला आवडलं नसावं. […]