नवीन लेखन...

डॉमिनोज पिझाचा जनक टॉम मोनॅगम

तीन दुकानांची आठवण देणारी तीन टिंबे, तीन डॉट्स डॉमिनोजच्या लाल, निळ्या लोगोवर अवतरली. मुळात सुरुवातीला गडद लाल, निळा व शुभ्र पांढरा रंग वापरण्यामागे लोकांचं लक्ष वेधणं हा हेतू होता. हे तीन रंग खूप प्रामुख्याने दिसतात हे लक्षात घेऊन ते निवडताना तीन दुकानांची आठवण तीन टिंबांसह लोगोवर उमटली. […]

मराठी वाङ्मयातील ग्रामीण कादंबरी

ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला वीणा सानेकर यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत.  […]

पैलतीर

आला आला आला आला आला पैलतीर । चला चला चला आता गावु हरिनाम आले हरिद्वार ।। धृ ।। त्रिभुवनी केवळ एक सत्य एकची हरिनाम । मनुजा मोहमाया मृगजळ सारे येथे नाही कुठे राम । जीव हा चालता, बोलता झणी जाईल सोडुनी दूरदूर ।। १ ।। जीवनी सारे सुख दुणावे, दुःख ते उणावे । जगता जगता सकला […]

वास्तववादी चित्रकार एस. एम. पंडीत

१९३८मध्ये त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात चित्रपटांचे पोस्टर करण्यापासून झाली. मेट्रो गोल्डविन मेयर कंपनीची पोस्टरे त्या वेळी अमेरिकेतून येत असत. ही पोस्टरे इथेच तयार करू शकेल अशा भारतीय चित्रकारांच्या शोधात कंपनी होती. त्यासाठी पंडित यांची निवड झाली. या कामासाठी तैलरंगाऐवजी अपारदर्शक जलरंगांचा (पोस्टर कलर) वापर पंडित यांनी सुरू केला. त्यांची कामे ‘मेट्रो’ सिनेमागृहाच्या शोकेसमध्ये झळकू लागली आणि रसिकांचे आकर्षण ठरू लागली. त्यानंतरच भारतामध्ये हिंदी चित्रपटांसाठीची पोस्टर निर्मिती सुरू झाली. […]

हुंदक्यांचा “ओटीपी” !

अचानक वृत्तपत्रात बाळासाहेब मंगेशकर पुण्यातील सरपोतदारांकडे येणार असल्याचा आणि त्यांच्या गीतांवर आधारीत ” मानसीचा चित्रकार तू ” हा कार्यक्रम असल्याचं दिसलं. मला तो “हुंदक्यांचा ओटीपी (One Time Password) ” हातून गमवायचा नव्हता. आयुष्याची पूर्ण ८० वर्षे आई झालेल्या मोठ्या दीदींच्या निधनानंतर भावगंधर्व पहिल्यांदाच बोलणार होते. ओटीपी काही विशिष्ट वेळेसाठी असतो- त्यादिवशी तो दुपारी ४ ते सायंकाळी ८ पर्यंत व्हॅलिड होता. […]

पहिली “सिक्रेट रेडीओ सर्विस” चालवण्याऱ्या उषा मेहता

डॉ. राम मनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन आणि पुरुषोत्तम त्रिकमदास यांच्यासह अनेक नेत्यांनी गुप्त काँग्रेस रेडिओला मदत केली. रेडिओ प्रसारणाने गांधी आणि भारतातील इतर प्रमुख नेते यांच्याकडून संदेश पाठविला. अधिकार्यांना रोखण्यासाठी,आयोजकांनी स्टेशन जवळजवळ दररोज स्थानांतरित केले. या रेडिओ स्टेशनवरून इंग्रजांनी सेन्सर केलेल्या सगळ्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचविण्यात येत असत. गांधीजींना अटक झालेली आहे, काँग्रेसचे इतर लोक जेलमध्ये आहेत, मेरठमध्ये सैनिकांनी उठाव केला त्यामध्ये 300 सैनिक मारले गेले. अशा अनेक बातम्या त्यावेळी या सिक्रेट रेडिओने लोकांपर्यंत पोहोचवल्या. […]

ज्येष्ठ नाट्यकर्मी अरुण होर्णेकर

अरुण होर्णेकरांनी आजवर ‘दिवा जळू दे सारी रात’सारख्या मेलोड्रामापासून ‘हैदोस’, ‘भोगसम्राट’सारख्या हिट् ॲ‍ण्ड हॉट नाटकांपर्यंत.. आणि ‘बेकेट’,‘वेटिंग फॉर गोदो’, ‘गिधाडे’ सारख्या ॲ‍टब्सर्ड, प्रश्नयोगिक, तसंच वास्तववादी नाटकांपासून ते ‘सख्खे शेजारी’सारख्या रेव्ह्यू प्रकारातल्या नाटकांपर्यंत सगळ्या पिंड-प्रकृतीची आणि प्रवृत्तीची नाटकं केली आहेत. […]

आत्मचरित्रकार मधुकर केचे

केचे ह्यांना आपल्या हयातीत १९८४ ला महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार प्राप्त झाला, १९८५ मधे घाटंजी येथील ३७ व्या विदर्भ साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांना बहाल झाले. १९९० ला तेल्हारा येथील मराठी प्राध्यापक परिषदेच्या अध्यक्षपदाची यशस्वी धुरा त्यांनी सांभाळली. तसेच केचे हे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे व महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार समितीचे सदस्य होते. अमरावती येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रितांच्या कविसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे होते. […]

नागबळी – Part 1

सुनीता माझी धाकटी बहीण. माझ्यापेक्षा फक्त दोन वर्षांनी लहान. लहानपणापासून दादा दादा म्हणून सारखी माझ्यामागे असते. आता ती दहावीला आणि मी बारावीला आलो तरी तिला माझ्याशिवाय करमत नाही. भांडेल, रुसेल पण शेवटी सुनीलदादा म्हणून लाडीगोडी करायला येणारच. माझ्या वडिलांची फिरतीची नोकरी. दर दोन तीन वर्षांनी बदल्या ठरलेल्या. मग नवीन गाव, नवीन शाळा, नवीन मित्र अशी मजा […]

बदमाश लाटा

समुद्रातील लाटांची उंची मोजण्यासाठी वेगवेगळी तंत्रं वापरली जातात. त्यातल्याच एका तंत्रानुसार संवेदक बसवलेल्या बोयऱ्यांचा वापर केला जातो. हा बोयरा म्हणजे पाण्यावर तरंगणारी डब्यासारखी एक वस्तू असते. या बोयऱ्यावरील संवेदक, लाटांमुळे होणाऱ्या बोयऱ्याच्या हालचालींची नोंद करतो. या नोंदींवरून त्या ठिकाणच्या लाटांची उंची कळू शकते. संवेदकानं मिळवलेली माहिती, जागतिक स्थानदर्शक यंत्रणेतील उपग्रहांद्वारे संशोधकांपर्यंत पोचते. […]

1 7 8 9 10 11 42
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..