आद्य कापड-कारखानदार विष्णु रामचंद्र वेलणकर म्हणजेच धनी वेलणकर
वेलणकरांनी विविधरंगी व लांब-रुंद पक्क्या रंगांच्या लुगड्यांचे उत्पादन सुरू केले. या लुगड्यांसाठी त्यांनी `पातळ’ हा शब्द रूढ केला. या उत्पादनाकरिता आवश्यक असलेली भांडवली रक्कम उभी करणे वेलणकरांच्या आवाक्यात नव्हते. त्यांनी ताणा तयार करण्यासाठी एक नवा मोठा लाकडी रूळ (बीम) शोधून काढला व त्यावर साध्या चात्यांच्या चौकटीवरून विशिष्ट प्रकारे ताणाभराई केली. यामुळे ताणाभराई (वॉर्पिंग) यंत्राची आवश्यकता उरली नाही. कांजी देण्याच्या साइझिंग यंत्राची गरज टाळण्यासाठी वेलणकरांनी दुहेरी सुताचा वापर केला. त्यामुळेच वेलणकरांना १९१२ मध्ये पुणे येथे तीन यंत्रमाग वापरून लहान कारखाना स्थापण्यात यश आले. […]