संस्कृतचे गाढे अभ्यासक पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार
गुलाम दस्तगीर बिराजदार हे प्रसिद्ध गझलकार बदीऊज्जमा बिराजदार यांचे वडील होत. पंडित गुलाम यांना राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ तिरुपती यांनी वाचस्पती या पदवीने सन्मानित केले होते. शहाजी हायस्कूल, सोलापूर व मुंबई येथे त्यांनी संस्कृत शिक्षक म्हणून सेवा केली. आदर्श शिक्षक म्हणून त्यांचा राष्ट्रपती यांचे हस्ते पुरस्कार मिळाला होता. तसेच विविध संस्थांनी त्यांना महापंडित, पंडितेंद्र, संस्कृतरत्नम, परशुरामश्री, विद्यापारंगत, वाचस्पती अशा पदव्या बहाल केल्या होत्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे ते सदस्य होते. महाराष्ट्र राज्य, संस्कृत पाठ्य पुस्तक निर्माण बालभारतीचे ते अध्यक्ष होते.बिराजदार यांना १८ हून अधिक पुरस्कार मिळालेले होते. […]